नांदेड जिल्ह्यात तिघांचा मृत्यू  
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. यात एकाचा साप चावल्याने, दुसऱ्याचा जळून तर तिसऱ्या घटनेत विष प्राशन केल्याने मृत्यू झाला.

Pralhad Kamble

नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. यात एकाचा साप चावल्याने, दुसऱ्याचा जळून तर तिसऱ्या घटनेत विष प्राशन केल्याने मृत्यू झाला. या घटनांच्या आकस्मिक मृत्यूच्या नोंदी विविध पोलिस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. Three- death- in- different -incidents- in- Nanded- district

याबाबत अधिक माहिती अशी की, मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथे राहणारा शेतकरी अरुण बालाजीराव पाटील ( वय ३५ ) हा ता. २२ जुलै रोजी आपल्या शेतात काम करत होता. यावेळी त्यांना विषारी सापाने चावा घेतला. जखमी अवस्थेत त्यांना हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा ता. २५ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची दत्तात्रय बालाजीराव पाटील यांच्या माहितीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक नरेंद्र यालावार करत आहेत.

हेही वाचा - विमानतळ पोलिसांनी झन्ना- मन्ना जुगार अड्ड्यावर कारवाई करुन पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या घटनेत आमगव्हाण, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथील सायली राजेश्‍वर सूर्यवंशी (वय १४) ही गॅसवर स्वयंपाक करीत असताना ता. २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास गॅसचा भडका झाल्याने तिच्या अंगावरील कपडे पेटले. यात ती मोठ्या प्रमाणात भाजली होती. तिला सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालय पोलिस चौकीचे अंमलदार डब्ल्यू. के. कांबळे यांनी पाठवलेल्या कागदपत्रांनुसार हदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक श्री सातपुते करत आहेत.

तर तिसऱ्या घटनेत हिमायतनगर तालुक्यातील अंधारी येथील सुभाष सटवाजी वाघमारे ( वय ३८) या शेतकऱ्याने कुठल्यातरी कारणावरुन विष प्राशन केल्याने त्याला भोकर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ही घटना ता. २५ जुलैच्या दुपारी एकच्या सुमारास घडली. पोलिस हवालदार आर. बी. राठोड यांच्या माहितीवरुन हिमायतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार श्री. कदम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT