मनोहर भोसले 
महाराष्ट्र

भोंदू मनोहरमामाच्या पाेलिस काेठडीत वाढ; साताऱ्यात झाली हाेती अटक

मंगेश कचरे

बारामती : बाळूमामाचा balumama अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेच्या manohar bhosale पाेलिस काेठडीत आणखी तीन दिवसांची वाढ झालेली आहे. मनाेहर भाेसले याची पाेलिस काेठडी संपल्याने त्याला आज (गुरुवार) बारामती पाेलिसांनी baramati police न्यायालयात हजर केले हाेते. मनाेहर मामावर दाेन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याच्या पाेलिस काेठडीत तीन दिवसांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. three-days-police-custody-manohar-bhosale-baramati-satara-karmala-sml80

भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याच्यावर बारामती आणि करमाळा येथे गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी (ता.१०) पुणे ग्रामीण पोलिसांनी साताऱ्यात त्याच्या मुसक्या आवळल्या. अटक केल्यानंतर त्यास बारामतीला नेण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास १६ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली हाेती.

आज मनाेहरमामा यास दुपारी अडीचनंतर न्यायालयात हजर केली जाण्याची शक्यता हाेती परंतु त्यापुर्वीच पाेलिसांनी त्याला न्यायालयात आणले. त्याला पाहण्यासाठी न्यायालयाच्या बाहेर नागरिकांची गर्दी हाेती. गुन्ह्यांच्या तपासाचे अनुषंगाने न्यायालयाने मनाेहरमामाला तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT