Beed Crime News
Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime : नातेचं ठरले वैरी! सलग 3 दिवसात 3 खून; खाकीच्या धाकावर प्रश्नचिन्ह

विनोद जिरे

Beed Crime News : बीड (Beed) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून खाकीच्या धाकावर प्रश्न निर्माण करण्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात सलग 3 दिवसांमध्ये 3 खूण झाले आहेत. वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे कौटुंबिक वादातून 16 वर्षीय पुतण्याची काकानेच कोयत्याने हल्ला करत खून केल्याची घटना घडली आहे. दुसरी घटना बीडच्या धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली आहे. ऊसतोड कामगाराच्या 16 वर्षीय मुलीची अत्याच्या मुलीने तिच्या मित्राच्या मदतीने विहिरीत ढकलून हत्या केली आहे.

तर तिसरी घटना बीड तालुक्यातील मुळूकवाडी येथे घडली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी, 80 वर्षीय बळीराम मसाजी निर्मळ यांची, सख्या पुतण्याने खून करत चुलतीला देखील गंभीर जखमी केलं आहे. याप्रकरणी बीडच्या वडवणी, दिंद्रुड, नेकनूर पोलीस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

दरम्यान तर या तिन्ही घटना गेल्या 3 दिवसात घडल्या आहेत. त्यामुळं खाकीच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर या तिन्ही घटनेत नातेच वैरी झाल्याचं समोर आलं आहे. या तिन्ही घटनेत नात्यातील कलह टोकाचे पाऊल उचलत असल्याच दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushma Andhare On Journalists | पत्रकारांच्या बातमीदारीवरच दडपण आणण्याचा प्रकार!

Maval Lok Sabha : मावळ लोकसभेत मविआ उमेदवाराकडून अजित पवारांना वाकून नमस्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Nashik Election: मोठी बातमी! महंत अनिकेत शास्त्री BJPकडून लोकसभा लढवणार? शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया 'साम'वर EXCLUSIVE

Sankarshan Karhade Poem | "तुम्ही कितीही बदला पक्ष...", कविता ऐकाच!

Mumbai Mega Block News: लोकल प्रवाशांनो, कृपया इथं लक्ष असू द्या! रविवारी नेमका कोणकोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT