Political News Saam TV
महाराष्ट्र

Thackeray vs BJP: कोकणात नितेश राणेंची मोठी खेळी, ठाकरे गटाचे 3 नगरसेवक भाजपच्या गळाला

Thackeray vs BJP: आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Sindhudurg News : कोकणात राणे विरुद्ध ठाकरे गट असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत आपली ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. नितेश राणेंच्या या प्रयत्नांना यश मिळालं आहे. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. वैभववाडी नगरपंचायतीचे नगरसेवक सुभाष रावराणे, श्रद्धा रावराणे, प्रदीप रावराणे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

नगरसेवक प्रदीप प्रकाश रावराणे, श्रद्धा रोहित रावराणे, सुभाष अनाजी रावराणे यांच्या पक्षप्रवेशावेळी केंद्रीय मंत्री नारायणर राणे देखील उपस्थित होते. सोबत संताजी रावराणे, प्रशांत रावराणे, रोहित रावराणे, आशिष रावराणे देखील उपस्थित होते. (Latest News Update)

वर्षभरापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत वैभववाडी नगरपंचायत भाजपने जिंकली होती. त्या निवडणुकीआधी भाजपचे 7 माजी नगरसेवक फोडले होते जे राजकारणात अस्तित्वहीन झाले. आमदार नितेश राणेंनी आज ठाकरे गटाच्या तीन आमदांराचा भाजप प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

Maharashtra News Live Update: पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

SCROLL FOR NEXT