Three children drowned in Wardha river in Chandrapur district
Three children drowned in Wardha river in Chandrapur district  Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur News: चंद्रपुरात पोहोण्यासाठी गेलेली तीन मुलं वर्धा नदीत बुडाली

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur Latest News: चंद्रपूर जिल्ह्यात पोायला गेलेली तीन मुलं वर्धा नदीत बुडाली आहेत. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे उजेडात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी चार मुलं वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेली. मात्र त्यातील एक मुलगा गावात परत आला आणि तीन मित्र वाहून गेल्याचं त्यानं सांगितलं. गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने नदी पात्रात मुलांचा शोध सुरु केला आहे. बुडालेली सर्व मुलं अंदाजे १० वर्ष वयोगटातील आहेत. प्रतिक जुनघरे, निर्दोष रंगारी, सोनल रायपुरे अशी बेपत्ता असलेल्या मुलांची नावे आहेत.

जलविहार करताना स्टंटबाजी जीवावर बेतली

दरम्यान, अलीकडेच बुलढाण्यात मेहेकेर तालुक्यातील देऊळगावमाळी जवळ असलेल्या कोराडी प्रकल्पात एक युवक बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रोशन मुरारी इंगळे असे या बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

मेहेकर तालुक्यातील देऊळ गावमाळी जवळ असलेल्या कोराडी प्रकल्पात विवेकानंद स्मारकावर लक्ष्मण गजानन इंगळे, (वय 22 वर्ष) आदेश किशोर इंगळे(वय 21 वर्ष) ऋतिक भारत सोनूने (वय वर्षे 23,) अनिकेत गणेश सुरडकर (वय वर्ष 24) हे तरुण प्रतिकन्या कुमारी परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

यावेळी तरुणांनी त्याठिकाणी तलावातील नौका विहार करण्याचा निर्णय घेऊन नौकेत् फेरफटका मारायला सुरवात केली. शेवटी नौका किनाऱ्यावर यायला लागली तेव्हा नौकेतील दोघांनी तलावात उडी मारून स्टँटबाजी करण्याचा प्रयत्न केला. हीच स्टंटबाजी त्यांच्या जीवावर आली आणि हे तरुण बुडायला लागले. त्यामधील एकाला नौका चालकाने वाचविले. मात्र दुसरा रोशन इंगळे हा पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीससुद्धा घटनास्थली पोहोचले. ज्यानंतर रोशन इंगळेचा शोध मोहिम सुरू केली. मात्र अद्याप रोशन इंगळे याचा मृतदेह सापडला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mamata Banerjee: लोकसभा निवडणुकीत भाजप 195 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, ममता बॅनर्जी यांचा दावा

Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी; ऐन निवडणुकीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT