nandurbar , crime news , police saam tv
महाराष्ट्र

ज्वेलर्सला फुटला घाम...,बिर्लांचा फाेन जाताच पाेलिसांच्या गाड्या सुटल्या सुसाट अन्...

चाेरटे सुसाट साक्रीच्या दिशेने निघाले हाेते.

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार भालेर रस्त्यावर कोपर्ली येथुन घराकडे परतणाऱ्या व्यापाऱ्याच्या गाडीच्या पुढे गाडी घालुन डोळ्यात मिरचीची पुड फेकत बंदुकीचा धाक दाखवत त्यास लुटल्याची घटना शुक्रवारी घडली. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलीसांच्या (police) गाडीने संबंधित चाेरट्यांचा पाठलाग केला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी शेतात गाडीसह मुदेमाल टाकुन तेथून पळ काढला.

या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नंदुरबार येथील रहिवाशी रूपेश सुमनलाल सोनार यांचे नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे दर्शन ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. रोज ते ये जा करतात शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास दुकान बंद करून ते नंदुरबार येथे मित्रासमवेत घराकडे परतत हाेते.

त्याचवेळीस नंदुरबार भालेर दरम्यान असलेल्या वडवद बारीजवळ एक कार मागून आली. त्यांनी व्यापा-याच्या गाडीच्या पुढे त्यांची कार उभी केली. त्यातुन चार जण उतरून रूपेश सुमनलाल सोनार यांना कार बाहेर येण्यास सांगितलं. तसेच बंदुकीचा धाक दाखवत डोळ्यात मिरची पुड फेकली.

त्यानंतर त्यांच्या जवळ असलेला सोन्या, चांदीचा माल लंपास केला. रूपेश सुमनलाल सोनार यांच्या गाडीच्या चावीसह मोबाईल ही लंपास केला. दरम्यान रूपेश सुमनलाल सोनार यांनी कोपर्ली येथील नवीन बिर्ला यांना फोनवरून घटनेची हकीकत कळवली.

त्यानंतर नवीन बिर्ला यांनी याबाबत पोलीसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान संबंधित चाेरटे सुसाट साक्रीच्या दिशेने निघाले हाेते. पोलीसांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळवली. त्यानंतर पाेलीसांची चक्र फिरली. चोरट्यांना आपल्या मागावर पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच त्यांनी छडवेल ते निजामपुर दरम्यान असलेल्या आखाडे येथे गाडी व मुद्देमाल टाकुन पळ काढल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात उशीरा पर्यंत नोंद करण्यात येत होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Pune : पुणेकरांची चिंता मिटली! धरणातील पाणी पातळीत वाढ; शहरात तूर्तास पाणीकपात नाही

SCROLL FOR NEXT