Sadar Bazar Police station  Saam TV
महाराष्ट्र

Jalna Crime News : चोरट्याने पोलीस चौकीसमोरुनच पोलिसाची दुचाकी लांबवली; घटना CCTVमध्ये कैद

Police Bike Stolen : जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही घटना समोर आली आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna News : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. सामान्य नागरिकांची एखादी मौल्यवान वस्तू चोरीला गेली तर ते मदतीसाठी पोलिसांकडेच जातात. मात्र चोरांनी जर पोलिसांच्या वस्तूवर डल्ला मारला तर त्यांनी कुठे जायचं असा प्रश्न निर्माण होतोय. कारण जालन्यामध्ये एका चोराने चक्का पोलिसाची दुचाकीच गायब केली.

जालन्यातील सदर बाजार पोलीस (Police)  ठाण्याच्या अंतर्गत ही घटना समोर आली आहे. कादराबाद पोलिस चौकीजवळ कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी लांबवली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिस कर्मचारी सकरुद्दीन तडवी यांनी आपली दुचाकी चौकीसमोर असलेल्या पार्किंगमध्ये उभी केली होती. त्या ठिकाणाहून एका चोरट्याने हातोहात ही दुचाकी पसार केली. (Latest Marathi News)

भरदिवसा पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरी गेल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाल्याने या चोरट्याला पकडण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावणात जेवणाची योग्य वेळ कोणती?

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

Chetana Bhat: पानाआड दडलंय सौंदर्य, महाराष्ट्राची हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Maharashtra Monsoon Destinations : ऑगस्टच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करताय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्या

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी; छावा संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT