Robbery in bank of Maharashtra at satara  saam tv
महाराष्ट्र

साताऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! जिलेटिनचा स्फोट करून 'बॅंक ऑफ महाराष्ट्राचे' ATM फोडले, त्यानंतर...

सातारा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सातारा : येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जिलेटिन कांड्यांचा स्फोट करुन बँक ऑफ महाराष्ट्रचे (Bank Of Maharashtra ATM) एटीएम फोडले. त्यानंतर चोरट्यांनी एटीएममध्ये असलेल्या ११ लाख रूपयांवर डल्ला मारला. ही धक्कादायक घटना शहरालगत असणाऱ्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे गावात घडलीय. (Gelatin sticks explosion in bank of Maharashtra ATM)

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर काळ्या स्प्रे ने सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून दरोडा टाकला. या चोरीच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. या घटनेची खबर पोलिसांना कळताच सातारा पोलीस अधीक्षक (Police) अजय कुमार बंसल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. चोरट्यांनी ११ लाखांची रक्कम लंपास केल्यामुळं परिसरात खळबळ माजली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मिस कॉलनं सुरू झाली लव्हस्टोरी; ५ मुलांच्या आईने थेट १९ वर्षांच्या तरुणासोबत थाटला संसार

Pune: पुण्यात एकूण किती आणि कोणत्या पेठा आहेत? पुणेकर तुम्हाला माहिती आहेत का?

Body heat before periods: पीरियड्सच्या काही दिवस आधी अचानक शरीरात जास्त उष्णता का जाणवते?

मुलगी मंत्री, मुलगा आमदार अन् वडील खासदार; मला तोच न्याय का नाही? भुजबळांचा रोख कुणाकडे?

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

SCROLL FOR NEXT