एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतून चंदनाच्या झाडाची चोरी  संजय जाधव
महाराष्ट्र

एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतून चंदनाच्या झाडाची चोरी

एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतून चंदनाचे झाड चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघड्क़ीस आली आहे. यासंदर्भात बुलढाणा पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

संजय जाधव

बुलढाणा : एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतून चंदनाचे झाड चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघड्क़ीस आली आहे. यासंदर्भात बुलढाणा पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

हे देखील पहा -

बुलढाणा मलकापूर रोडवर एसटी महामंडळाचे विभागीय कार्यशाळा आहे. या कार्यशाळेतील लोहार विभाग परिसरांमध्ये चंदनाचे झाड होते. हे चंदनाचे झाड पाच ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. एसटी महामंडळातच्या कार्यशाळेत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतानाही चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेराला चकमा देत हे चंदनाचे झाड चोरून नेले आहे.

एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेच्या आवारामध्ये असलेले चंदनाचे झाड चोरीला गेले. त्या चंदनाच्या झाडाच्या गाभ्यामध्ये सहा महिन्यांपूर्वी चोरट्याने ड्रिल करून चंदनाच्या झाडा मध्ये असलेल्या गाभ्याची चाचपणी केली होती. सहा महिन्यानंतर हे चंदनाचे झाड अलगत चोरून नेले यासंदर्भात एसटी महामंडळाचे विभागीय यंत्र अभियंता स्वप्निल धनाड यांनी यासंदर्भात सिक्युरिटी विभागाकडे तक्रार केली आहे. तर सिक्युरिटी विभागाने बुलढाणा पोलिस स्टेशनमध्ये या चोरीची फिर्याद नोंदवली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT