वृद्ध दाम्पत्याच्या गळ्याला चाकू लावून लाखोंची चोरी Saam Tv
महाराष्ट्र

वृद्ध दाम्पत्याच्या गळ्याला चाकू लावून लाखोंची चोरी !

एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरात दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची घटना अहमदपूर शहरात घडली आहे.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : गत तीन आठवड्यांपासून लातूर Latur जिल्ह्यातील अहमदपूर Ahamadpur शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यातच एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरात दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची घटना अहमदपूर शहरात घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र चारचाकी वाहन सोडून चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Theft of millions by stabbing in the neck to couple

अहमदपूर येथील नागोबा नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवसांब शिवप्रसाद खकरे (वय ५९) आणि त्यांची पत्नी शीला राहतात. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास यांच्या घराचे दार लाथाबुक्क्यांनी तोडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीच्या गळ्यावर चाकू ठेवत कपाटातील मंगळसूत्र, तीन तोळे बांगड्या, कानातील फुले, झुमके, सरपाळे, अंगठी, कानातील रिंग, चांदीचे कडे असा साडेचार लाखांचा ऐवज लुटून पाेबारा केला.

हे देखील पहा-

दरम्यान, घडलेली घटना काेणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. खकरे यांचे घर लोकवस्तीपासून दूर असून, त्यांच्या घरावर पाळत ठेवत चोरट्यांनी सदरचा ऐवज लुटला. दरम्यान, चाकूर येथे मंगळवारी पहाटेच २ वाजता एका जवानाच्या घरावर दराेडा टाकल्याची माहिती अहमदपूर पाेलिसांना Police मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी नाकाबंदी केली. अहमदपूर येथील आयटीआय जवळ चोरांचा पाठलाग केला, मात्र कार सोडून चाेरट्यांनी पलायन केले. याप्रकरणी अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT