Yavatmal
Yavatmal  Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal News : ठाकरेंच्या घरी चोरी; कुटुंबिय घरात नसल्याचं पाहून साधला डाव, लाखोंचा मुद्देमाल लंपास

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

Yavatmal News : यवतमाळ येथे चोरीच्या घटनांचे प्रमाण सतत वाढत चालले आहे. दिवसाढवळ्या घरफोडी होत आहे. अशात आता चक्क ठाकरेंच्या घरी देखील चोरीची घटना घडली आहे. या घटनेत त्यांच्या घरातून तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. (Latest Yavatmal News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ठाकरे कुटुंबिय बाहेर गावी गेले होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे आणि रोख रकमेसह एकूण सव्वालाख रूपयांचा ऐवज लंपास केला. यवतमाळच्या उज्ज्वल नगर परिसरात ही घटना उघडकीस आली आहेत.

दरम्यान याबाबत अवधूत वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली. वैद्यकीय अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले डॉक्टर रवींद्र ठाकरे हे उज्वल नगरात राहतात.

ते कुटुंबासह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते दरम्यान चोरट्यांनी डाव साधला बंद दाराचा कुलूप कोंडा तोडला त्यानंतर आत प्रवेश करत घरातील साहित्य असतावस्थ केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking Milk: रात्री झोपण्यापूर्वी दूध का पिऊ नये?

Covid Vaccine Certificate: कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील PM मोदींचा फोटो गेला कुठं?, समोर आलं कारण

Today's Marathi News Live : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला ते संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती, चंद्रहार पाटील यांचा रोख कोणाकडे?

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT