crime news , buldhana, dongoan, police, varad jewellers SaamTv
महाराष्ट्र

Crime News : महिलेच्या हात चलाखीला सराफ फसला; लाखाेंचे दागिने चाेरीस

या चाेरीचा तपास पोलिस करीत आहेत.

संजय जाधव

Buldhana News : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील डोणगांव येथील बसस्थानक परिसरात असलेल्या वरद ज्वेलर्स या दुकानातून लाखांचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. मोठ्या हात चलाखीने दागिने चोरताना महिला दुकानातील कॅमे-यात कैद झाली आहे. या चाेरीचा तपास पोलिस (police) करीत आहेत. (Maharashtra News)

डोनगाव येथील वरद ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानात रविवारी दुपारच्यावेळी एक महिला बुरखा घालून आली. तिने सेव्हन पिस दागिने दाखवा असे सांगितलं. यावेळी दुकान मालक तुषार आलेगावकर यांनी संबंधित महिलेस दागिने दाखविले.

त्यानंतर महिलेने कानातले दाखवा असे म्हटले त्यानूसार आलेगावकर यांनी कानातले दाखविले. संबंधित महिलेने कानातले आणि डोरले बाजुला ठेवुन बाहेरुन पैसे घेऊन येते असे सांगितले. त्यानंतर ती दुकानाबाहेर पडली. दुकान मालक आलेगावकर यांनी दागिने मोजले असता त्यामध्ये काही दागिने कमी पडले.

आलेगावकर यांनी पाेलीसांत तक्रार केली. या तक्रारीत सेव्हन पिस 3 नग किंमत 66 हजार , 4 सिगल ईअर रिंग 55 हजार रुपये असे एकूण एक लाख 21 हजाराचे दागिने लंपास झाल्याचे म्हटलं आहे. या चाेरीचा तपास पोलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT