Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचं आमिष दाखवलं अन्.., नागपुरातील धक्कादायक प्रकार

कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून एका दलालाने दोन तरुणींना जाळ्यात ओढले.

Satish Daud

मंगेश मोहिते, साम टीव्ही

Nagpur News : कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून एका दलालाने दोन तरुणींना जाळ्यात ओढले. दोघींनाही सेक्स रॅकेट’मध्ये ढकलले. याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली असता, त्यांनी छापा टाकून दोन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना देहविक्रीच्या व्यापारात ढकलले. याची माहिती पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली. माहिती मिळताच, पोलिसांनी (Police) नरेंद्रनगरातील नवनाथ सोसायटीतील श्रध्दा इन हॉटेल अचानक छापा टाकला.

पोलिसांनी सुरूवातीला बनावट ग्राहकाद्वारे आरोपीसोबत संपर्क साधला. आरोपीने तरुणीचा एका रात्रीत १२ हजार रुपये असा सौदा केला. दरम्यान, बनावट ग्राहकाने हॉटेवर जाताच, पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांकडून दोन तरुणींची सुटका करण्यात आली. आरोपी हा पैशाचे आमिष दाखवून दोन मुलींकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आरोपीविरूध्द बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath : दुचाकीस्वाराची बस चालकाला दगडाने मारहाण; चालक गंभीर जखमी

Sonu sood: सोनू सूदच्या अडचणी वाढल्या, थेट ईडीने चौकशीसाठी पाठवले समन्स, वाचा नेमकं प्रकरण

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Maharashtra Politics: मराठवाड्यात भाजपसह पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांसह २० सरपंचांचा ठाकरे सेनेत प्रवेश

IND Vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान हँडशेक वादावर बीसीसीआयने मौन सोडलं; ICC ने पाकला तोंडावर पाडलं

SCROLL FOR NEXT