Viral Video
Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Viral Video: अरेच्चा! ट्रक रस्त्यात अडकला म्हणून तरुणाने केली अशी करामत; अन् थेट गिनीज वर्ल्ड रिकॉर्डवर घेतली झेप

Ruchika Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ भयभीत करणारे तर अनेक व्हिडिओ एखाद्या कामासाठी प्रेरणा देणारे असतात. एखाद्या खड्डयात गाडी अडकली तर ती बाहेर काढण्यासाठी वाहनचालकाला मोठी कसरत करावी लगते. अशात एका पठ्ठ्याने चक्क त्याच्या दाताने खेचून मोठा ट्रक खड्ड्यातून बाहेर काढला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Viral Video)

तब्बल १५,७३० किलो वजनाचा ट्रक दोरीच्या सहाय्याने दाताने खेचल्याने सर्वत्र या तरुणाचे कौतुक केले जात आहे. इतकेच नाही तर त्याच्या कामगिरीसाठी गिनीज वर्ड रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. अशरफ सुलीमान असे या तरुणाचे नाव आहे. व्हिडिओ शेअर करत अशरफने १५,७३०Kg वजनाचा ट्रक दाताने उचलला, असे लिहिले आहे.

अशरफ हा इजिप्तचा रहिवासी आहे. सदर व्हिडिओ देखील तिथेच रेकॉर्ड करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओवर नेटकरी सतत लाईक्साचा वर्षाव करत आहेत. यात एका युजरने लिहिले आहे की, स्वत:ची काळजी घेत स्टंट करा. तर दुसऱ्या एकाने हा निव्वळ मूर्खपणा म्हटले आहे. मात्र अनेकांनी अशरफच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच अनेक तरुण त्याच्या ताकतीला सलाम करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT