धक्कादायक! वंशाला दिवा हवा म्हणून छळ केलेल्या महिलेचा मृतदेह, गळफास घेतलेल्या अवस्थेत Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक! मुलगाच हवा म्हणून छळ केलेल्या पिडीतेचा मृतदेह, गळफास घेतलेल्या अवस्थेत

पहिल्या दोन मुलींच जन्माला आल्या आता तिसऱ्यांदा तरी मुलगाच व्हायला दवा यासाठी तिचा छळ सुरु होता. संबंधीत पिडीतेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात वंशाला दिवा हवा म्हणून सासरच्या मंडळींनी सुनेच्या मागे तगादा लावला होता पहिल्या दोन मुलींच जन्माला आल्या आता तिसऱ्यांदा तरी मुलगाच व्हायला दवा यासाठी तिचा छळ सुरु होता. संबंधीत पिडीतेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून की कोणी तिला गळफास लावला हे कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.The woman's body was found strangled

हे देखील पहा-

हिंगोली जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे, जिल्ह्यातील चींचाळा गावात पुन्हा एकदा , वंशाला दिवा हवा म्हणून सासरकडून सतत छळ होणाऱ्या, विवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू झाला आहे, अश्विनी मांदळे असे या महिलेचे नाव आहे, गेल्या अनेक वर्षांपासून अश्विनीकडे सासरच्या मंडळींनी मुलाचा अट्टाहास धरल्याने या महिलेला दोन मुलींना जन्म द्यावा लागला, त्या नंतर तिला मुलगा देखील झाला, मात्र तरी देखील तिचा माहेरावरून पैसे घेऊन येण्यासाठी सतत छळ सुरूच होता.

हे सर्व सुरू असताना काल अचानक अश्विनीचा मृतदेह तिच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने नातेवाईकांनी सासरकडील मंडळीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, दरम्यान गुन्हा दाखल होई पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT