प्रियकराच्या मदतीने केला चिमुरड्याचा खून; आईच्या नात्याला काळीमा लावणारी घटना! लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

प्रियकराच्या मदतीने केला चिमुरड्याचा खून; आईच्या नात्याला काळीमा लावणारी घटना!

आदित्य उघडे असं खून करण्यात आलेल्या ६ वर्षाच्या मुलाचं नाव आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : विवाहबाह्य संबधांमध्ये मुलाचा अडसर होत असल्याने मुलगा (Son) हरवल्याचा बहाणा करत एका महिलेने (woman) तिच्या प्रियकराच्या (Her Lover) मदतीने स्वतःच्या 6 वर्षाच्या मुलाचा खून (Murder) केला आहे. प्रेमात मुलगा अडथळा ठरत असल्यानं स्वतःच्या मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. जालन्यातील अंबडमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) दोघांना ताब्यात घेतलं आहे. आदित्य उघडे असं खून करण्यात आलेल्या ६ वर्षाच्या मुलाचं नाव आहे. तर नवनाथ जगधने आणि गणेश रोकडे अशी आरोपींची नावं आहेत.(The woman has murdered her own 6-year-old son)

हे देखील पहा-

अंबड तालुक्यातील (Ambad taluka) डावरगाव (Davargaon) येथील 21 वर्षीय विवाहित महिला तिच्या नातेवाईकाच्या उपचारासाठी मुलाला घेऊन अंबड येथे दवाखान्यात (Hospital) आली होती. नातेवाईकाला दवाखान्यात भरती केल्यानंतर औषध घेण्यासाठी ही महिला मेडिकलमध्ये (Medical) गेली. पण तिच्या मुलाला एका ठिकाणी थांबवण्याचा बहाणा करून तिने मुलाला तिथे असलेल्या तिच्याच प्रियकराच्या स्वाधीन केल. त्यानंतर मुलगा हरवल्याचा बहाना करून या महिलेने अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा कामाला लागली.बुधवारी संध्याकाळी आदित्यचा मृतदेह घनसावंगी रस्त्यावरील एका नाल्याच्या बाजूला असल्याची माहिती पोलिसांना कळाली.पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता या मुलाच्या तोंडामध्ये बोळे कोंबलेले दिसले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर हा बेबनाव उघडकीस आला.

प्रियकर नवनाथ जगधने याच्यासाठी या विवाहित महिलेने स्वतःच्या 6 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला असल्याची माहिती पोलीस तपासा दरम्यान समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare New Project: शिरगावच्या खुनाचं गुंतागुंतीचं कोडं सुटणार का? 1 मे पासून आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर उलगडणार शिरगावचं रहस्य

४ टर्म आमदार राहिलेला भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: आमदार दिपक केसरकर यांची घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

SCROLL FOR NEXT