Bhadara Accident
Bhadara Accident अभिजित घेरमारे
महाराष्ट्र

Bhandara: आईला भेटायला निघालेल्या नणंद-भावजयीला मृत्यूनं गाठलं, एकीचा हातच तुटला

अभिजित घोरमारे

भंडारा : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने स्कूटीवरुन जाणाऱ्या वहिनी-नणंदेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara District) साकोली तालुक्यातील मोहघाट जंगल परिसरातत घडली आहे. सुरुची रवींद्र मल्लेवार वय वर्ष 36 असं मृतक वहिनीचे नाव असून सोनाली आंगीडवार वय वर्ष 28 नणंदेचे नावं आहे. या दोघी आपल्या स्कूटीने घुटसावरी वरून साकोलीकडे येताना अज्ञात वाहनानी धडक दिल्यांने त्यांना जबर धडक दिली.

यामध्ये सुरूची मल्लेवार या मुलीचा खांदा पूर्णपणे तुटला असून दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागला आहे तर सोनाली संगीडवार यांच्या दोन्ही पायाला खूप गंभीर मार लागल्याने त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये (Sakoli Sub-District Hospitals) भरती करण्यात आलं होतं.

अतिशय गंभीर जखमी असल्याने सुरुची मल्लेवार यांना भंडारा सामान्य रुग्णालयात (Bhandara General Hospital) उपचारासाठी पाठविण्यात आले होते, मात्र उपचारा दरम्यान सुरुचि मलेवार यांच्या भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

तर येथे सोनाली आंगीडवार यांच्या साकोली येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. सुरुची मल्लेवार यांच्या आई गोंडउमरी PSC येथे आई नर्स असल्यामुळे त्यांना भेटायला दोन्ही मृतक जात होत्या. मात्र, मोहघाटा जंगलामध्ये झाडांची दोन्ही बाजूला कटाई सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे त्यामुळे एका अज्ञात भरधाव वाहनाने अचानक धड़क दिल्याने या दोघींचा मृत्यु झाला आहे. कोली पोलिस फरार वाहनाच्या शोध घेत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : बारामतीत शरद पवार गटाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ३ तक्रारी दाखल

Lizards News : बापरे! नागपूरमध्ये आढळली सापासारखी पाल; दुर्मिळ प्रजातीचा फोटो व्हायरल

Ranjitsinh Mohite-Patil News | रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची गळाभेट

प्रदर्शनाआधीच Jolly LLB 3 वादाच्या भोवऱ्यात, शुटिंग सुरू होताच न्यायालयात याचिका, नेमकं काय घडलं ?

Narendra Modi : कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT