Saam TV
महाराष्ट्र

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले...

चौथ्या लाटेच्या अनुषगाने टेस्टिंग, डोस वाढवण्याबाबद राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सूचना

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी आज चौथ्या लाटेच्या अनुशंगाने VC बैठक घेतलीय यांच्याशी सोबत आज झालेल्या बैठकीतून टेस्टिंग, नागरिकांना डोस वाढवण्याबाबद त्यांनी सूचना केल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलीय.

तसेच ज्या ज्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहेत, अशा ठिकाणी हे डोस वाढवले जाणार आहेत त्याचं बरोबर बूस्टर डोस बाबद ही हर घर घर दस्तक ही योजना राबविली जाणार आहे. त्याचंबरोबर ही योजना राबवत असताना आशा वर्कर यांना दोन हजार रु. मानधन दिले पाहिजे अशी मागणी ही केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली असल्याची माहिती ही राजेश टोपे यांनी दिली.

पुण्याबद्दल सांगताना टोपे म्हणाले, पुण्यात (Pune) वाढत्या म्युकरमायक्रोसेसच्या (Mucormycosis) रुग्णाबाबद ही महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने घेतले आहे. ज्या बाबद जी महागडी उपचार पद्धती आहे, त्या बाबद मुख्यमंत्री यांना प्रस्ताव आरोग्यविभागाच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती देत त्यात काही आर्थिक आधार रुग्णांना देता येईल का ? या बाबद ही विचार सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

हे देखील पाहा-

तसेच, ज्या नागरिकांना मोती बिंदू झाला त्यांना कॅटरेक्ट ऑपरेशन करताना डॉक्टर यांच्यावर भार पडतो त्या बाबद ही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून हे काम व्हावं म्हणून या संस्थांना दोन हजार रु केंद्राकडून तरतूद आहे,हे ऑपरेशन टार्गेट फक्त पन्नास हजार आहे, हे टार्गेट ही दीड लाखा पर्यंत करावं अशी मागमी केंद्राकडे आज झालेल्या बैठकीत केली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Benefits: महागडे प्रोडक्ट सोडा; चेहऱ्याला लावा बटाटा

Indapur Politics: इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का, भावाने दिला विरोधी उमेदवाराला पाठिंबा

Singham Again VS Bhool Bhulaiyaa: सिंघम अगेन की भुल भूलैया 3, तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा टॉप १० मधील 'तगडा' चित्रपट कोणता?

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

SCROLL FOR NEXT