विद्यार्थिनीने बनवलं आत्महत्या रोखणारे उपकरण: Ratnagiri Saam Tv
महाराष्ट्र

विद्यार्थिनीने बनवलं आत्महत्या रोखणारे उपकरण

देवरुख तालुक्यामधील कोंडये येथील निर्मला भिडे जनता विद्यालय आणि इंद्रनील तावडे कनिष्ठ महाविद्यालय येथे एका विद्यार्थिनीने कौतुकास्पद कामगिरी केली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी: देवरुख (Devrukh) तालुक्यामधील कोंडये येथील निर्मला भिडे जनता विद्यालय (School) आणि इंद्रनील तावडे कनिष्ठ महाविद्यालय येथे एका विद्यार्थिनीने (student) कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ९वीमध्ये शिकणाऱ्या दिव्या दीपक लाड या विद्यार्थिनीने तयार केलेल्या एस.पी. हूक या आत्महत्या (self-slaughter) रोखणाऱ्या उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर मानक अवार्ड प्रदर्शनाकरिता निवड झाली आहे.

हे देखील पहा-

या प्रदर्शनाकरिता जिल्ह्यातून एकूण ७५० नामाकने नोंदविण्यात आली होती. त्यामधून ७७ जणांची निवड करण्यात आली आहे आणि त्यामध्ये दिव्याचा समावेश आहे. याकरिता तिला विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, मुख्याध्यापक (Headmaster) अरुण कुराडे आणि सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या तरुणांमध्ये नैराश्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी तरुणांचे समुपदेशन करण्यासह विविध स्तरावरून जनजागृती केली जात आहे.

नैराश्यामुळे तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे प्रयत्न सुरु असले तरी देखील खूप वेळा अशा धक्कदायक घटना दैनंदिन जीवनात घडत असतात. या सर्वांचा विचार करून आपण एस. पी. हूक हे उपकरण आत्महत्या रोखेल अशा उपकरणाचा शोध लावल्याचे दिव्या लाडने सांगितले आहे. याकरिता आपल्याला विज्ञान शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन देखील मोलाचे ठरले आहे, असे दिव्याने स्पष्ट सांगितले आहे. राज्यस्तरीय प्रदर्शनाकरिता या उपकरणाची निवड झाली आहे, ही नक्कीच आनंदाची विषय असला तरी देखील या उपकरणाचा वापर होण्याची वेळ येऊ नये, असे आपल्याला वाटते असे मत दिव्याने यावेळी व्यक्त केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT