चोरी गेलेले दागिने फिर्यादीस पोलिसानी केले परत लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

चोरी गेलेले दागिने फिर्यादीस पोलिसानी केले परत

तपास करून ही आरोपी सापडत नसल्याने सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

लक्ष्मण सोळुंके

जालना - शहरातल्या  गोपिकिशन नगर भागात राहणाऱ्या गोविद रामप्रसाद पांडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने Theft कपाटात ठेवलेले दागिने Gold व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना चार महिन्यांपूर्वी जालना Jalna शहरात घडली होती.

हे देखील पहा -

या प्रकरणी गोविद रामप्रसाद पांडे यांच्या तक्रारी वरून सदर बाजार जालना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करून ही आरोपी सापडत नसल्याने सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यात राज्या बाहेरील टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रयत्न करुन आरोपी निष्पन्न करण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा तपास सुरू केला असता आरोपी मध्यप्रदेशातील इंदौर शहरातील असल्याचे निष्पन्न झाले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी इंदौरमध्ये जाऊन सराईत आरोपी पवन ऊर्फ भुन्थ रामदास आर्या याला राजा बाग इंदौर येथून शिताफीने अटक करून घटनेतील मुद्देमाल जशात तसा जप्त करून आरोपीकडून महाराष्ट्रातील इतर जिह्यातील केलेले गुन्हे सुद्धा उघडकीस आणत अटक केली. सदर बाजार पोलिसांनी न्यायालयाचे आदेशाचे पालन करत गुन्हात जप्त केलेल्या सोन्याचे दागीने व रोख ४ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल फिर्यादी गोविद रामप्रसाद पांडे यांना परत केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT