महापुरामुळे शासकीय गोदामातील खराब झालेल्या धान्याला सूटली दुर्गंधी अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

महापुरामुळे शासकीय गोदामातील खराब झालेल्या धान्याला सूटली दुर्गंधी

महापुरात शासकीय गोदामातील खराब झालेल्या धान्याला सूटली दुर्गंधी आहे. त्यामुळे हे खराब धान्य इतरत्र हलविण्याची मागणी करण्यात येत आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: जिल्ह्यात मागील वर्षी आलेल्या महापुरात शासकीय गोदामातील असलेले हजारो क्विंटल धान्य खराब झाले आहे. या धान्याला आता दुर्गंधी सूटली असून एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी झालेल्या या धान्याला इतरत्र हलविण्याचे औचित्य जिल्हा प्रशासनाने न दाखविल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे खराब धान्य इतरत्र हलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (The stench was released on the spoiled food in the government godown due to the floods)

हे देखील पहा -

भंडारा शहरात सामान्य रुग्णालयाच्या बाजूला शासकीय धान्य गोदाम असून स्वस्त धान्य वितरक योजनेत अंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना ह्या गोदामातून मालाचा पुरवठा केला जातो. मागील वर्षी भंडारा जिल्ह्यात आलेल्या महापुरात गोदामाच्यावर 5 फुट पाणी असल्याने अक्षरक्षः हे धान्य पूर्णता पाण्याखाली बुडाले होते, त्यामुळे सलग 10 दिवस पुराच्या पाण्यात धान्य राहिल्याने हजारो क्विंटल गहु यात खराब झाला. यात शासनाचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. यातील खराब गहु हा गोदामातून काढून गोदाम परिसरात उघड्यावर टाकून दिल्याने महापुरात खराब झालेला गहु एक वर्ष कालावधी लोटला तरी तिथेच पडून असल्याने आता त्यावर अळ्या लागल्या असून कुजल्याने परिसारत असह्य दुर्गंधी पसरली आहे.

गोदाम प्रशासनाने ह्या खराब गव्हाची नोंद करत त्याला इतरत्र हलविण्याचा प्रस्ताव पाठविला खरा, मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय न झाल्याने महापुरात खराब झालेल्या गव्हामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे ह्या गोदामाच्या बाजूला रुग्णालय, जलशुद्धीकरण केंद्र यांसारख्या महत्वपूर्ण इमारती लागून असल्याने धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे खराब धान्य इतरत्र हलविण्याची मागणी जोर धरत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:पुसद-अमरावती मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर नागरिकांची कोंडी

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार, मोदी-ममतांची प्रतिष्ठा पणाला

Shocking : भयानक! चैन खेचून रेल्वे थांबवली अन् तरूणीला जबरदस्ती नेलं; ६ जणांनी केला सामूहिक बलात्कार

Tomato Buying Tips: गावरान टोमॅटो कसा ओळखाल? खरेदी करण्यापूर्वी ५ गोष्टी लक्षात ठेवाच

Weekly Horoscope: या आठवड्यात नशिबाची साथ कोणाला? तुमच्या राशीनुसार जाणून घ्या यश-अपयशाचे संकेत

SCROLL FOR NEXT