पैशाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलाने केला पित्याचा खून... Saam Tv
महाराष्ट्र

पैशाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलाने केला पित्याचा खून...

बीडच्या पाटोदा तालुक्यातील पारनेर गावातील धक्कादायक घटना...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड - बँकेतील Bank पैशाच्या Money हव्यासापोटी, पोटच्या मुलानेच पित्याला जबर मारहाण करून खून केला आहे. तर चुलतभावाच्या मदतीने अंत्यविधी करुन, पुरावा देखील नष्ट केल्याची धक्कादायक घटना,बीडच्या Beed पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे घडली आहे. मात्र निनावी फोनने याचे बिंग फुटले आहे. चौसाळा येथील मुलाने जन्मदात्या आईला मारल्याची घटना ताजी असताना, आता पुन्हा हा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

महादेव औटे वय 55 वर्ष रा. पारनेर असं मयत पित्याचं नाव आहे. तर योगेश महादेव औटे असं नराधम, क्रूरकर्मा असणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे.दि. 23 ऑगस्ट रोजी या धक्कादायक घटनेला नराधम योगेशनं अंजाम दिला आहे. तर पित्याचा मृत्यू झाल्यानंतर भाऊ गणेश महादेव औटे, विष्णु बलभिम औटे, वाल्मिकी बलभिम औटे, परमेश्वर बलभिम औटे यांनी संगणमत करुन पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन पुरावा नष्ट केला. मात्र सौताडा बीटचे अमलदार आदिनाथ तांदळे, यांना एक निनावी फोन आल्यानंतर हे बिंग फुटले असून या घटनेला वाचा फुटलीय.

दरम्यान या प्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिस हवालदार आदिनाथ तांदळे यांच्या फिर्यादीवरून, पाटोदा पोलिस ठाण्यात कलम 302, 201, 34 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Smell: हे ५ पदार्थ ठेवा दाराजवळ, सापांचा धोका होईल कायमचा दूर

Ashu Reddy Fraud Case: कोण आहे आशू रेड्डी? अभिनेत्रीवर आहे ९ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

5 Fruits To Avoid After Non-Veg: नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चुकूनही 'ही' 5 फळे खाऊ नका, शरीरात तयार होऊ शकतं विष

Maharashtra News Live Update: नाशिकमधील टीसीएस प्रकरणात निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय २ मे रोजी

Success Story: जिद्द, मेहनत आणि चिकाटीची कहाणी! जैनवाडीच्या मनोजकुमार जमदाडे यांची MPSC मध्ये दमदार झेप

SCROLL FOR NEXT