'त्या' तरुणीच्या आत्महत्येचा खुलासा; नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला बलात्कार संजय राठोड
महाराष्ट्र

'त्या' तरुणीच्या आत्महत्येचा खुलासा; नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला बलात्कार

आरोपी पोलिस कर्मचाऱ्यास सात दिवसांची सुनावली पोलिस कोठडी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड 

यवतमाळ:  उमरखेड (umarkhed news) शहरातील वसंत नगर भागात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या जिल्हा दंगल पथकातील पोलिस कर्मचाऱ्याच्या खोलीत शुक्रवारी एका (२० वर्षीय) गंगा नामक तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा पुढे आला आहे. 'त्या' पोलीस कर्मचाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे. त्यामुळे बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे नोंदवून पोलीस कर्मचाऱ्याला उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे. (yavatmal crime news marathi)

या प्रकरणी पोलिस कमर्चारी विजय हटकर (वय ४२) यास २५ डिसेंबरला रात्री उमरखेड ठाणेदारांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याला ७ दिवसांची २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अनेक वेळा नागरिक संकटकाळात मदतीसाठी पोलिसांकडे विश्वासाने धाव घेतात. मात्र त्याच पोलिस विभागातील एका कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस असल्याने पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचे दिसून येत आहे. मृत गंगा कोरडे ही तरुणी पुसद तालुक्यातील वेणी येथील रहिवाशी आहे.

हे देखील पहा-

या मुलीला आरोपी पोलिस कर्मचारी विजय हटकर याने पोलिस दलात नोकरी लावून देतो म्हणून उमरखेड येथील खासगी पोलिस प्रशिक्षण अकॅडमीत प्रवेश मिळवून दिला होता. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी ठेवून अत्याचार करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात मृत गंगाचे वडील संजय कोरडे (रा. वेणी ता. पुसद) यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

त्या तक्रारीवरून आणि मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणीवरून ही बाब निष्पन्न झाली आहे. या सर्व बाबी पाहता उमरखेड पोलिसांनी संबंधित पोलिस कर्मचारी विजय हटकर याच्याविरुद्ध अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी विजय हा जिल्हा दंगल नियंत्रण पथकात कार्यरत होता आणि त्यांची नियुक्ती बंदोबस्तकामी उमरखेड येथे केली होती. तो ६ डिसेंबरपासून रजेवर होता, अशीही माहिती ठाणेदार अमोल माळवे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

SCROLL FOR NEXT