वंशाच्या दिव्यासाठी सासूची धडपड! 1-2 नाहीतर आणल्या तब्बल 6 सुना 
महाराष्ट्र

वंशाच्या दिव्यासाठी सासूची धडपड! 1-2 नाहीतर आणल्या तब्बल 6 सुना

आपल्या कुळाचा, घराण्याचा वंश आणि वारसा हा फक्त मुलगाचं चालवू शकतो. यासाठी धांदाड विचारांनी आणि बुरसटलेल्या मानसिकतेने ग्रासलेले लोक, कधी काय करतील ?

विनोद जिरे

बीड: आपल्या कुळाचा, घराण्याचा वंश आणि वारसा हा फक्त मुलगाचं चालवू शकतो. यासाठी धांदाड विचारांनी आणि बुरसटलेल्या मानसिकतेने ग्रासलेले लोक, कधी काय करतील ? याचा नेम नाही... असाच काहीसा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. पोटच्या मुलाला मूल होणार नाही हे माहिती झाल्यानंतर, "वंशाला दिवा पाहिजे" ही मागणी करत, चक्क सासू-सासऱ्याने सुनेला मारहाण करून, चक्क भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. एवढंच नाही तर या सासूने मुलासाठी चक्क 6 सूना आणल्या होत्या ? काय आहे प्रकार सविस्तर जाणून घेऊयात.

बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या कडा गावात, नंदीबैलाच्या माध्यमातून भिक्षा मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे मोठोबा भिसे आणि त्यांचं कुटुंब राहतं. पीडिता ही मोठोबा भिसे यांची पत्नी आहे. याविषयी पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की माझी सासू म्हणाली की तुझा नवरा बाप होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तुझं टेस्ट ट्यूब बेबी केली आहे. आणि त्यामुळे तुला मुलगी झालीय.

मात्र आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा पाहिजे, त्यामुळे तू माझ्या भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित कर. याला विरोध दर्शविल्याने सासू-सासर्‍यांनी मला मारहाण करत सतत छळ केला. यावेळी माझे पती बाहेरगावी गेले होते. मात्र त्यांचा मारहाणीला वैतागून नाईलाजास्तव त्यांनी सांगितलं तसं मी केलं. मात्र हे सर्व नवऱ्याला माहित झाल्यानंतर नवऱ्याने मला घराबाहेर काढलं. आज मला नवरा पण स्वीकारत नाही आणि ज्याचं हे मूल आहे, तो मुलगा देखील स्वीकारत नाही. त्यामुळे माझ्याकडे जगावं कसं हा प्रश्न आहे ? तर याविषयी पोलिसात नवरा, सासू,सासरा आणि त्या मुलावर गुन्हा दाखल आहे. मात्र आरोपी अद्याप अटक नाहीत. त्याचबरोबर आता माझ्या मुलाला नाव कोणाचा देऊ ? असा देखील प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. त्यामुळे मला न्याय द्यावा.अशी देखील मागणी पीडितेने केली आहे.

तर या विषयी पीडितेच्या भावांने एक धक्कादायक आरोप केलाय. तो म्हणाला की माझ्या बहिणीच्या सासूला एकूण तीन मुलं आहेत. त्यापैकी पहिल्या मुलाला 2 पत्नी आहेत, दुसऱ्याला 3 आहेत, आणि लहाण्याला 1 आहे. त्यापैकी पाच सूनाला हाणमार करून मुलबाळ होत नाही म्हणून माहेरी पाठवल्या. मात्र माझी बहिण नांदत असतांना देखील, तिला मारहाण करून दुसऱ्या मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडलं.

मुलगा पाहिजे मुलगी नको ही जी समाजात मानसिकता आहे, ती बदलायला हवी. याविषयी आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. त्या अनुषंगाने आमच्याकडून तपास सुरू आहेत. फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यांनी आरोप केलेल्या बाकीच्या सुनांनी काही तक्रार दिली तर त्याच्या देखील गुन्हा आम्ही दाखल करू. जात पंचायतीचा काही विषय झाला आहे का ? याचा देखील तपास सुरू असून दोषींवर कडक करवाई केली जाईल. अशी माहिती पोलीस अधीक्षक आर. राजस्वामी यांनी दिली आहे.

हा पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी करणारा धक्कादायक प्रकार आहे. ती जी सासू आहे, ती महिलांच्या नावावर कलंक आहे. त्यामुळे या सासुबाईचा पोलिसांनी पीसीआर घेऊन, या सासुबाईंनी काय काय कृत्य केलं आहे, हे जगासमोर आणावं. आणि तिला कठोर अशी कारवाई करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या हेमाताई पिंपळे यांनी केली आहे.

दरम्यान मुलाच्या हव्यासापोटी आणि वंशाचा दिवा पाहिजे या बुरसटलेल्या मानसिकतेत जगणारे लोक, कधी काय करतील हे सांगता येत नाही.. एक नव्हे... दोन नव्हे... तर तब्बल 6 सुना या मुलाचे हव्यासापोटी या सासूने केल्या आणि त्यातील पाच सुनांना मूल होत नाही म्हणून हाकलून दिलं. असा गंभीर आरोप पीडित महिलेच्या भावाने केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT