बापरे! चार दिवसांपूर्वी अंत्यविधी झालेला व्यक्ती जिवंत होऊन परत आला SaamTvNews
महाराष्ट्र

बापरे! चार दिवसांपूर्वी अंत्यविधी झालेला व्यक्ती जिवंत होऊन परत आला

जालना शहरातील रेल्वे स्थानक मालधक्का परिसरात चार दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीचा वाहनाखाली येऊन दुर्दैवी मृत्यु झाला होता.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरातील रेल्वे स्थानक माल धक्का परिसरात चार दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीचा वाहनाखाली येऊन दुर्दैवी मृत्यु झाला होता. या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी व फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. याच वेळी गेल्या अडीच महिन्यापासून चंदणझिरा परिसरातील सुभाष प्रभाकर जाधव नावाचा व्यक्ती मिसिंग होता.

हे देखील पहा :

सुभाष जाधव आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु (Death) झालेल्या व्यक्तीचे वर्णन हुबेहुन जुळत असल्याने या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी सुभाष जाधव यांच्या कुटूंबियांना दिली. कुटूंबियांची वाहनाच्या धडकेत मृत्यू पावलेला व्यक्ती हा सुभाष जाधवच असल्याची ओळख पटवल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संपूर्ण प्रक्रिया करवून कुटूंबियांच्या ताब्यात दिला. कुटूंबियांची आणि नातलगाने विधिवत अंत्यविधी केला. मात्र, चक्क आज अंत्यविधी झालेले सुभाष जाधव घरी परत आल्याने कुटूंबियांना आणि परिसरातील नागरिकांना अवाक झाले.

सुभाष प्रभाकर जाधव जिवंत असून आपण दुसऱ्याच कुणाचा अंत्यविधी केल्याचं लक्षात येताच कुटूंबियांनी घटनेची माहिती कदीम जालना (Jalna) पोलिसांना दिलीय. या संपूर्ण घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. सुभाष जाधव पुन्हा घरी सुखरूप घरी परतल्याने कुटूंबियांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ज्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यात आला तो व्यक्ती कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT