अहमदनगर - कै. माजी खासदार दिलीप गांधी यांच्या परिवाराची भेट घेत चंद्रकांत पाटील यांनी सांत्वन केले. 
महाराष्ट्र

चंद्रकांतदादा विचातायेत, आताही पूर आलाय मग कुठं गेले पाटील?

सचिन आगरवाल

अहमदनगर - आघाडीचे सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल फेल ठरले आहे. नेते फक्त कार्यक्रमात मग्न आहेत. कोविडच्या काळात तर सर्व महाराष्ट्राने या सरकारचे गांभीर्य पाहिले. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. बहुतांशी ठिकाणी पूर आला आहे. परंतु सरकारमधील मुख्यमंत्री घरात आहे. मंत्री आणि नेते कुठे आहेत, हे तुम्हीच शोधा असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी लगावला.

श्री. पाटील हे आज नगरमध्ये आले होते. त्यांनी माजी खासदार कै. दिलीप गांधी यांच्या परिवाराची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.The Maharashtra government cannot do any work properly

श्री. पाटील म्हणाले, या सरकारला कोविड covid,मराठा आरक्षण हे ज्वलंत प्रश्न आहेत. परंतु या सरकारला कसलेच गांभीर्य नाही. ज्या काळामध्ये कोविड स्थिती भयंकर होती. त्या वेळेला इथले पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापुरात गोकुळची निवडणूक लढवत होते. सध्या महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. पाऊस थांबायचे नाव घेत नाही. कोल्हापूरमध्ये पाणी वाढत चालले आहे. दोन वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झालीय. त्या वेळी देवेंद्र फडणवीस आणि मी प्रत्यक्ष फिल्डवर होतो. त्यावेळी हेच जयंत पाटील विचारत होते कुठे गेले पाटील.

आता त्यांचंही आडनाव पाटील आहे. आम्ही विचारतो कुठे गेले पाटील...मुख्यमंत्री उद्धवजी तर घराबाहेर पडत नाहीत. तरी त्यांचे सहकारी म्हणतात, उत्तम पद्धतीने प्रशासन चालते. इतर सहकाऱ्यांनी तरी जनतेत यावे ना... असा सवाल जयंत पाटील Jayant patil यांच्यासह आघाडीतील नेत्यांना केला.

पाटील यांनी कै. गांधी यांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, गांधी यांनी पक्षाचे निष्ठेने काम केले. त्यांच्या निधनानंतर भेटण्यास येणार होतो. मात्र, कोरोनास्थिती गंभीर होती. त्यामुळे भेटता आले नाही. त्यांच्या निधनामुळे खूप दुःख झाले, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.The Maharashtra government cannot do any work properly

सरोज गांधी, सुवेंद्र गांधी, देवेंद्र गांधी, अनिल गांधी यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, भैया गंधे, वसंत लोढा, सुनील रामदासी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा

Pune Crime: पुण्यात 'लाडक्या बहिणी' असुरक्षित, ७ महिन्यांत २६५ बलात्काराच्या घटना; आरोपींवर कारवाई कधी?

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, भाऊंचं होतंय तोंडभरून कौतुक

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

SCROLL FOR NEXT