Sadabhau Khot भारत नागणे
महाराष्ट्र

'आधी उधारी चुकवा, मगच जा'; हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोतांना अडवलं (पाहा Video)

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारीसाठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली.

भारत नागणे

पंढरपूर : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने आज दुपारी पंचायत समितीच्या आवारात माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना अडवलं होतं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारी साठी हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली.

या घटनेची सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) चर्चा सुरू झाली आहे. अशोक शिनगारे हे २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते होते. निवडणूकीमध्ये अशोक शिनगारे यांनी पदरमोड करून उधारीने जेवणावळी घातल्या होत्या. त्याची उधारी अद्याप सदाभाऊ खोत यांचेकडे थकीत आहे.

पाहा व्हिडीओ -

वारंवार उधारीची मागणी करून‌ ही मिळत नसल्याने संतप्त झालेल्या अशोक शिनगारे यांनी आज सदाभाऊ खोत यांना अडवून, 'आधी उधारी द्या आणि मगच पुढे जावा; असं म्हणत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.‌

यावेळी सदाभाऊ खोत यांनी हॉटेल मालकाची समजूत काढून सुटका करून घेतली. सदाभाऊ आज पंचायतराज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सांगोला पंचायत समितीमध्ये आले होते. सर्वांसमोर उधारीसाठी सदाभाऊ खोत यांना अडवल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

Maharashtra News Live Update: भिमाशंकरच्या दुरवस्थेवर सुप्रिया सुळेंची टीका; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT