दुर्दैवी : अज्ञात वाहनाच्या धडकेत शाळेत निघालेल्या शिक्षक पित्यासह मुलीचा जागीच मृत्यू Saam TV
महाराष्ट्र

दुर्दैवी : अज्ञात वाहनाच्या धडकेत शाळेत निघालेल्या शिक्षक पित्यासह मुलीचा जागीच मृत्यू

मुलीला शाळेत घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद (Teacher) शिक्षकाच्या दुचाकीला वाहनाने जोराची धडक दिल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

दिपक क्षीरसागर

लातूर : लातूर शहरात मुलीला शाळेत घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद (Teacher) शिक्षकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

शिक्षक वडील आणि त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय पांचाळ वय ३८ तर मुलगी प्रतीक्षा पांचाळ वय 13 अशी मृतांची नावे आहेत. दत्तात्रय पांचाळ हे जिल्हा परिषद शिक्षक (Zilla Parishad Teacher) असून ते मुळचे लातूर तालुक्यातील भुसणी येथे वास्तव्यास होते. त्यांची मुलगी प्रतीक्षा ही लातूरमधील ज्ञानेश्वर इंग्लिश स्कुलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होती.

प्रतीक्षाला दररोज वडील दत्तात्रय पांचाळ शाळेत सोडून पुन्हा पानचिंचोली (Panchincholi) येथे त्यांच्या शाळेमध्ये मुलांना शिकविण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणेच सोमवारी सकाळी ते प्रतीक्षाला घेऊन ते लातूरला येत असताना म्हाडा कॉलनी जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या संबंधी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात (Latur Rural Police Station) अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

दत्तात्रय पांचाळ (Dattatraya Panchal) यांची काही दिवसापूर्वीच बदली झाली होती. ते आधी पानचिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक होते. मात्र, मुलगी प्रतीक्षा लातूरमधील शाळेत असल्याने ते तिला शाळेत सोडण्यासाठी रोज जात असत आणि नंतर पानचिंचोलीकडे जात. मात्र त्यांच्या या दिनक्रमाला सोमवारी सकाळी ग्रहण लागले आणि त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि अपघातात या मायपित्याचा दुर्दैवी अंत झाला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

IAS Transfer: तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली, आता कुठे करण्यात आली नियुक्ती?

पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

SCROLL FOR NEXT