बीडच्या इतिहासात पहिल्यांदा रंगली महिला कुस्तीची आखाडा विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडच्या इतिहासात पहिल्यांदा रंगली महिला कुस्तीची आखाडा

स्पर्धेत औरंगाबादची श्रुती महिला मल्ल विजयी.

विनोद जिरे

बीड : बीडच्या इतिहासात पहिल्यांदा महिला कुस्ती आखाडा रंगला होता. यामध्ये महाराष्ट्रातून महिला पैलवानांनी सहभाग नोंदविला होता. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानावर पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेला बीडकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या स्पर्धेत तब्बल 351 महिला पैलवानांनी सहभाग नोंदवला होता. पैलवान ग्रुप कडून मराठवाडा स्तरीय महिला कुस्ती स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.

हे देखील पहा-

या स्पर्धेत बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर, धुळे, वाशीम, हिंगोली, सातारा, यवतमाळ, भंडाऱ्यासह इतर जिल्ह्यांतील महिला मल्ल सहभागी झाले होते. त्यांना 2 लाख 51 हजार रुपयांपर्यंतची बक्षीसे देण्यात आली आहेत. तर प्रथम विजेत्याला 2 किलो चांदीची गदा देण्यात आली आहे. या स्पर्धेत औरंगाबादची पैलवान श्रुती बामणवत आणि सानिका पवार यांच्यात अंतिम लढत झाली.

यामध्ये श्रुती बामणवत विजयी झाली. श्वास रोखून धरायाला लावणारा हा सामना 18 मिनिटे चालला होता. यावेळी राष्ट्रीय पदक विजेते तथा पुण्याचे डीवायएसपी राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयी श्रुती हिला 2 किलो वजनाची चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT