Beed Accident Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident : चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार थेट दीडशे फूट खोल दरीत; ३ जण गंभीर जखमी

बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा घाटातील घटना...

विनोद जिरे

Beed Accident News : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील नगर- जामखेड महामार्गावरील अंभोरा घाटात भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दीडशे फूट खोल दरीत कोसळली कोसळल्याची घटना घडली आहे.

या अपघातात (Accident) गाडीतील 3 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडी दीडशे फूट खोल दरीत पडल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घाटात टर्न न बसल्याने वळणावरुन कार थेट दीडशे फूट खोल दरीत कोसळली आहे. या वळणावर न दिसणारा कठडा आहे. हाच दगडी कठडा तोडून कार खाली कोसळली.

दरम्यान, या घाटात अपघातचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी घाटाची माहिती देण्याचे फलक लावण्यात यावेत अशी मागणी आता केली जात आहे. या भीषण अपघातात गाडीतील 3 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, शिवसेनेत वेगवान हालचाली; श्रीकांत शिंदेंसह ३९ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Dhurandhar 2 : 'धुरंधर २'च्या यशात मिठाचा खडा; आदित्य धरवर चोरीचा आरोप, कायदेशीर कारवाईची धमकी

Viral video mumbai: मुंबईतील मुलुंड स्टेशनवर घडला धक्कादायक प्रकार, रूळांवर उतरून दोन तरुणांची हाणामारी

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

खाकीने ओलांडली मर्यादा! पोलीस ठाण्यातच ASI कडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हादरवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT