डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढवली; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण Saam Tv
महाराष्ट्र

डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढवली; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

देशात अत्यंत वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचे तब्बल 30 रुग्ण नाशिक जिल्ह्यात सापडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: देशात अत्यंत वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचे Delta Variant तब्बल 30 रुग्ण नाशिक Nashik जिल्ह्यात सापडले आहेत. यापैकी दोन रुग्ण नाशिक शहरातील आहेत. तर नाशकातील सिन्नरसह चांदवड, निफाड, नांदगाव, इगतपुरी आणि येवला तालुक्यातील काही जणांना डेल्टा व्हेरिएंट या विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी डेल्टा व्हेरियंटला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे आणि सज्जतेचे आदेश दिले आहेत.

हे देखील पहा-

पुण्यातील Pune एनआयव्हीकडे National Institute of Virology जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी पाच टक्के रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जातात. कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरूपाचा Mutation आढावा घेणारी जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचणी एनआयव्हीमध्ये केली जाते. नाशिकमधून Nashik गेल्या 15 दिवसांत पाठविण्यात आलेल्या 155 स्वॅबपैकी 30 जणांच्या स्वॅबमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे नाशिकची आरोग्य यंत्रणाही खडबडली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी आदेश दिले की, संबंधित 30 रुग्णांच्या संपर्कात राहण्याचे व त्यांच्या आरोग्यातील बदलांकडे बारकाईने लक्ष देण्यात यावे.

जिल्हाधिकारी Collector सूरज मांढरे यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. तरी हा व्हेरिएंट डेल्टा प्लस इतका घातक नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य यंत्रणा ही परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांनी यापुढे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षाविषयक नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT