khambatki ghat, satara, pune, nitin gadkari, pune - satara highway, nh4 saam tv
महाराष्ट्र

खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर; 926 कोटी रुपयांचा प्रकल्प

इंग्रजीवर्णाक्षर 'एस' प्रमाणे असलेल्या वळणमार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल असेही गडकरींनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पुणे-सातारा महामार्गावरील (nh4) खंबाटकी घाटातील (Khambatki Ghat) नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नुकतीच दिली आहे. (khambatki ghat latest marahi news)

खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देणारा ट्विट (tweet) गडकरी यांनी नुकतेच केले आहे. पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर सध्या प्रत्येकी तीन मार्गिका असलेल्या दुहेरी बोगद्याचे काम सुरु आहे. इंग्रजीवर्णाक्षर 'एस' प्रमाणे असलेल्या वळणमार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल. यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मोठी घट होईल असेही गडकरी यांनी नमूद केले.

गडकरी पुढं लिहितात पुणे-सातारा आणि सातारा-पुणे कडील प्रवासाठी या बोगद्यातून लागणारा प्रत्येकी ४५ मिनीटे आणि १० ते १५ मिनिटांच्या वेळेची बचत हाेईल. केवळ ५ ते १० मिनिटात या बोगद्यातून प्रवास करता येईल. हा बाेगदा 6 .43 किलाेमीटर लांबीचा असून या प्रकल्पासाठी अंदाजे 926 कोटी रुपये खर्च येणार असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत वंचितकडून उमेदवारी कायम

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

शेतकरी कर्जमाफीनंतर राज्य सरकारनं पशुपालक, कुक्कुटपालकांसाठी घेतला मोठा निर्णय,बळीराजाला आले 'अच्छे दिन'

सामच्या बातमीचा इम्पॅक्ट: नीट पेपरफुटीनंतर त्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचे आदेश

SCROLL FOR NEXT