बैलगाडीतील मनमोहक बाप्पा तुमच्या गावाकडच्या आठवणी ताज्या करेल... नक्की पहा राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

बैलगाडीतील मनमोहक बाप्पा तुमच्या गावाकडच्या आठवणी ताज्या करेल... नक्की पहा

कालबाह्य होत असलेली बैलगाडी, जात, उखळ, पेट्रोमॅक्स, कंदील, शेतीची अवजारे, या वस्तू देखाव्यात दाखविल्या आहेत. तसेच बैलगाडा शर्यत सुरू करण्याचं आव्हान या देखाव्यातून करण्यात आलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर,रायगड

रायगड: आपल्या लाडक्या बाप्पाला स्थानापन्न करण्यासाठी गणेशभक्त विविध नैसर्गिक, चलचित्र मखर तयार करतात. गणेशभक्तांनी बनविलेल्या मखरात गणराय विराजमान होतात. असेच मखर अलिबाग तालुक्यातील तळवली येथील अरुण नाईक आणि त्यांच्या मुलगा दीप याने बनविले आहे. शेतकरी कुटूंब असलेल्या नाईकांनी चक्क घरात बैलगाडी तयार करून त्यात गणरायाला विराजमान केले आहे. कालबाह्य होत असलेली बैलगाडी, जात, उखळ, पेट्रोमॅक्स, कंदील, शेतीची अवजारे, या वस्तू देखाव्यात दाखविल्या आहेत. जुन्या कालबाह्य होत असलेल्या या वस्तू नव्या पिढीला ज्ञात करण्यासाठी आणि बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू व्हाव्यात या उद्देशाने हा देखावा बनविला असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. (The charming Bappa in the bullock cart will refresh the memories of your village ... look for sure)

हे देखील पहा -

शेतकरी म्हटलं की त्याच्याकडे बैलगाडी ही असतेच. बैलगाडी ही शेतकऱ्यांचे पहिले वाहन आहे. मात्र काळानुरूप बैलगाडी आता कालबाह्य होऊ लागली आहे. त्याचबरोबर जात, उखळ, कंदील, शेतीची जुनी अवजारेही कालबाह्य होऊ लागली आहेत. घरातील कामे लवकर होण्यासाठी आता अत्याधुनिक यंत्र उपलब्ध झाली असल्याने जुन्या वस्तू आता कालबाह्य होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या वस्तूचे जतन होणे आणि पुढील पिढीला कालबाह्य होत असलेल्या वस्तूची माहिती व्हावी यासाठी बैलगाडी देखावा केला आहे. त्याचबरोबर शासनाने बैलगाडी शर्यती बंद केल्या आहेत. पूर्वी बैलगाडी शर्यत हा शेतकऱ्यांसाठी विरंगुळा होता. मात्र तोही बंद झाला असल्याने पुन्हा शासनाने बैलगाडी शर्यत सुरू व्हावी हाही उद्देश या देखाव्यामागचा आहे.

बैलगाडीतील मनमोहक बाप्पा तुमच्या गावाकडच्या आठवणी ताज्या करेल... नक्की पहा

दरवर्षी आम्ही वेगळे मखर गणरायासाठी तयार करीत असतो. यावर्षी शेतकऱ्यांचे वाहन असलेली बैलगाडी ही देखाव्यातून साकारून गणरायाला त्यात विराजमान केले आहे. तसेच भाविकांना आकर्षित करण्यासाठी सेन्सर लाईट बसवली आहे. गणेशभक्त गणरायाच्या दर्शनाला आल्यानंतर सेन्सरने लाईट सुरू होते. घरातील सर्वच रुमना जुन्या पद्धतीची रंगरंगोटी केली असून वारली पेंटींगही केली आहे.

नाईक यांनी बनविलेला बैलगाडीत विराजमान झालेले गणराय देखावा हा गणेशभक्ताचे आकर्षण ठरला आहे. नाईक यांच्या घरी हा देखावा बघण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांचे असलेले वाहनात गणराय बसविले असून त्यातून जुन्या वस्तूचे ही दर्शन नाईक कुटूंबानी या देखाव्यातून घडविले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? आज ठरणार! मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT