भरधाव कारची दुचाकीला धडक; दोन युवक जागीच ठार Saam Tv
महाराष्ट्र

भरधाव कारची दुचाकीला धडक; दोन युवक जागीच ठार

बीडच्या मांजरसुंबा पाटोदा महामार्गावरील दुर्दैवी घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड : भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात रात्रीच्या दरम्यान मांजरसुंबा- पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी वाघिरा फाट्यावर झाले आहे.

हे देखील पहा-

पोपट भानुदास मस्के (वय- 38) आणि घैनीनाथ विठ्ठल मस्के (वय 40) दोघे रा.भाळवनी ता. बीड अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. पोपट आणि घैनीनाथ हे दोघेही कारखान्याची उचल आणण्यासाठी दुचाकीवर पारनेर या ठिकाणी गेले होते. ते दुचाकी क्र. एमएच-13, 3973 वरून गावी येत असताना, पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच-16 एटी- 960 या क्रमांकाच्या कारने जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. तर घटनेची माहिती समजताच नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि. मुस्तफा शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT