Beed Crime News, Beed Latest Marathi News Saam tv
महाराष्ट्र

अवैध गर्भपात प्रकरण; आरोपी महिलेचा मृतदेह आढळला

खुन की आत्महत्या? पोलिसांकडून तपास सुरू...

विनोद जिरे

बीड - तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या एका महिलेचा बीड परिसरातील पाली येथील तलावात मृतदेह आढळला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. सीमा डोंगरे असे मृत महिलेचे नाव आहे. सीमावर अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. आज पहाटे सदर महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाली येथील तलावात सिमा डोंगरे या महिलेचा मृतदेह आढळले आहे. ती बीडच्या (Beed) डीपीरोड भागातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी पर्यंत ती नर्सचे काम करीत होती. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या? याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि एजंट असलेल्या अंगणवाडी सेविका असणाऱ्या मनीषा सानप हिच्याकडे तब्बल 29 लाखांची रोकड सापडली आहे. यामध्ये 500 च्या 2 हजार रूपयांच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. तसेच जमीन, कोट्यावधींचे बंगलेही तिच्या नावावर आहेत. एजंटांकडे एवढे पैसे म्हणल्यावर मुख्य सुत्रधाराकडे किती असतील? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी (Police) पती, सासरा, भाऊ, मनिषा सानप नावाची अंगणवाडी सेविका, लॅबवाला, नर्स यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात 5 जणांविरोधात रात्री उशिरा पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, काल रात्री अवैध गर्भपात प्रकरणात ताब्यात घेतलेल्या, महिला एजंट मनीषा सानपच्या गेवराई शहरातील आलिशान बंगल्यावर छापेमारी (Raid) करण्यात आलीय. यावेळी तिच्या बंगल्यात गर्भपात (Abortion) करण्यासाठी लागणारं साहित्य, त्याचबरोबर सोनोग्राफी करण्यासाठी लागणारं जेल यासह इतर साहित्य देखील सापडलं.

मृत शीतल गाडेचं देखील गर्भलिंग निदान (Gender Detection) याचं बंगल्यात करण्यात आलं होत. तर यासाठी 45 ते 50 हजार रुपये घेतले जात होते, अशी माहिती बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे मृत महीलेचा गर्भपात हा तिच्या शेतातील एका गोठयात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं काल दिवसभर गेवराई डेरेदाखल असणारं आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन आज बक्करवाडी येथील गर्भपात केलेल्या गोठ्याची पहाणी करणार आहेत. त्यामुळं आता या ठिकाणी काय सापडणार ? हा गर्भपात कोणी केला ? सोनोग्राफी नेमकी कोणी केली ? यामध्ये कोण डॉक्टर सहभागी आहेत का ? याचा तपास सुरू असून याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT