Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: टोमॅटोनंतर कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचे आभार; अहमनगरमध्ये झळकले बँनर्स

Ahmednagar News: टोमॅटोनंतर कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचे आभार; अहमनगरमध्ये झळकले बँनर्स

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा या गावात एक बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) संतप्त भावना मांडून मोदी सरकारचे अभिनंदनाचा असलेला हा बोर्ड सध्या (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यात चांगला चर्चेचा विषय झाला आहे. (Maharashtra News)

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यापूर्वी टोमॅटोचे भाव सुद्धा केंद्र सरकारमुळे कमी केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून या भावनेला मोकळी वाट करून देत अज्ञात लोकांनी पारनेर तालुक्यातील जवळा या गावात मुख्य बाजारपेठेत मोदी सरकारचे अभिनंदन करण्याचा बोर्ड लावला आहे. 

काय आहे या बँनरवर 

'टोमॅटोचे भाव पाडल्यानंतर कांद्याचे (Onion) भाव पडण्यासाठी तातडीच्या प्रयत्नाबद्दल मोदी सरकारचे तमाम शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार' अशा आशयाचा फलक चर्चेचा विषय ठरला. नवीन हिटलर शाही असाही मजकूर या फ्लेक्स बोर्डवर लावण्यात आल्यामुळे हा बोर्ड सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. फ्लेक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र हा बोर्ड भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने काढून टाकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून आणलेली काकडी कडू निघाली? फेकून देऊ नका, 'या' सोप्या ट्रिकने घालवा कडवटपणा

Kalyan : कल्याणमध्ये खळबळ! लॉजमध्ये जखमी अवस्थेत आढळले बहीण-भाऊ; कारण अत्यंत चिंताजनक, पोलीसही हादरले

Maharashtra News Live Update: पुणे नाशिक महामार्गावर तिरंगा हातात घेत चार तरुणांचे आंदोलन

Rain Alert : शुक्रवारी कोणत्या जिल्ह्याला पावसाचा इशारा? IMD ने ५ दिवसांचा अंदाज सांगितला; विकेंडला पाऊस कोसळणार का?

आषाढी एकादशीसाठी उपवासाला बनवा चविष्ट शेंगदाण्याचे लाडू, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT