Thane News Saam tv
महाराष्ट्र

Thane News : मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत पाल, ठाणे महानगरपालिका शाळेतील धक्कादायक प्रकार

Thane News : ठाणे महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी देण्यात येते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून अनेक शाळेमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होत असल्याचे समोर आले

विकास काटे, ठाणे

ठाणे : शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन देण्याची योजना सरकारने सुरु केली आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेत मुलांना दुपारच्या वेळी मध्यान्ह पोषण आहारात खिचडी दिली जात असते. मात्र बऱ्याचदा हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार ठाणे महापालिकेच्या शाळेत पाहण्यास मिळाला असून मनपाच्या शाळा क्रमांक ८८ मध्ये खिचडीत चक्क पाल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

ठाणे (thane) महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी देण्यात येते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून अनेक शाळेमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होत असल्याचे समोर आले आहे. खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही. या मुलांना ही खिचडी देण्यात येते, या खिचडीतून आगासन गावात ठाणे महानगरपालिका (School) शाळा क्रमांक ८८ येथे दुपारी मुलांना देण्यात आलेल्या खिचडीत पाल असल्याचे आढळून आले. खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या ४० मुलांना याचा त्रास जाणवू लागला आहे. 

दरम्यान याची तात्काळ सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. महापालिकेकडून डॉक्टरांची टीम शाळेत रवाना झाली असून अनेक मुलांना उलटीचा त्रास जाणवत आहे. अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारावर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी; लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सक्त अशी शिक्षा झाली पाहिजे; अशी मागणी होत आहे. गेल्या दोन महिन्यात दिवा विभागात अनेक घटना घडल्या आहेत. साबेगावात अशीच घटना घडली होती. बी. आर. नगर मध्ये पण अशाच प्रकारच्या घटना या वारंवार विभागात घडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT