Kalu Waterfall Saam Tv
महाराष्ट्र

Kalu Waterfall News: काळू धबधबा पर्यटकांसाठी बंद, तरुण बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

Priya More

Thane News: सध्या पावसाळा सुरु आहे त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात पर्यटन ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटक जातात. धबधब्यावर जाऊन मित्र-मैत्रिणींसोबत मजामस्ती करायला अनेकांना आवडते. पण कधी कधी या धबधब्यांच्या (Waterfall) ठिकाणी जाणं अनेकांच्या जीवावर बेतल्या असल्याच्या घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत.

अशामध्ये माळशेजमधील काळू धबधब्याजवळ (Kalu Waterfall) पाय घसरुन एक पर्यटक बेपत्ता झाला आहे. या तरुणाचा शोध सुरु आहे पण तो अद्याप सापडला नाही. या घटनेनंतर प्रशासनाने हा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळू धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. माळशेजमधील काळू धबधब्याजवळ पाय घसरून 1 जण बेपत्ता झाला आहे. ठाणे हद्दीतील ही घटना आहे. हैद्राबादच्या उटी येथील 4 तरुण याठिकाणी फिरण्यासाठी आले होते. या तरुणाला बेपत्ता होऊन २४ तासांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण हा तरुण अद्याप सापडला नाही. रेस्क्यू टीमची शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

काळु धबधबा हा निसर्गाचा सौदर्य आहे. या धबधब्यावरुन खाली पडलेले पाणी वा-याच्या दिशेने पुन्हा उलट्या दिशेने येते. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षक ठरतोय. मात्र या ठिकाणी पर्यटक बेपत्ता झाल्यामुळे प्रशानाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर काळू धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT