Thane News Saam tv
महाराष्ट्र

Thane Fraud Case : विद्यार्थ्यांकडून फी घेऊन क्लासला लागले कुलूप; क्लासच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

Thane News : क्लासमधील शिक्षण अचानक थांबल्याने मुलांच्या शिक्षणासाठी नवीन क्लाससाठी पैशाची उभारणी करताना पालकांना प्रचंड ओढाताण सहन करावी आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी चालू केली

विकास काटे, ठाणे

ठाणे : महाविद्यालयासोबत विद्यार्थी खासगी क्लास लावत असतात. अशाच प्रकारे ठाण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून फि घेऊन मध्येच क्लास बंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली एका नामांकित इंजिनिअरिंग क्लासच्या मुख्य संचालकासह ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि इतरांविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठाणे शहरातील बाजारपेठ परिसरात एका मॉलच्या ठिकाणी हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी क्लास सुरु करण्यात आलेला होता. संबधित क्लासने जवळपास ८० हून अधिक पालकांकडून ३ कोटी २० लाख इतकी फी आकारली असल्याची माहिती समोर आली आहे. या क्लासमधील शिक्षण अचानक थांबल्याने मुलांच्या शिक्षणासाठी नवीन क्लाससाठी पैशाची उभारणी करताना पालकांना प्रचंड ओढाताण सहन करावी आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे.

काही महिने सुरळीत चालला क्लास 
सदरच्या प्रकरणातील तक्रारदार नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये राहतात. त्यांच्या मुलाला आयआयटी इंजिनीअरींगची पूर्व तयारी करायची असल्याने त्यांनी मुलाचा प्रवेश संबिधत क्लासच्या ठाणे शाखेत घेतला होता. त्यांनी २ लाख ६४ हजार रुपये तर इतरही पालकांनी त्यांच्या पाल्याची सुमारे चार लाखांच्या आसपास फी भरली होती. काही महिने हा क्लास सुरळीत सुरु होता. मात्र, या क्लासची पुण्यातील शाखा बंद झाल्याचे पालकांना कळताच पालकांनी ठाणे शाखेच्या प्रमुखाला याविषयी विचारले. 

फसवणुकीचा गुन्हा दाखल 

तर ठाण्यातील शाखेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र काही कालावधीनंतर ठाणे शाखेच्या इंजिनिअरींग क्लासची आर्थिक स्थिती खराब असून आता पुढे हा क्लास चालू ठेवू शकत नाही. अशी माहिती या प्रमुखाने दिल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. नंतर पालकांनी क्लासच्या संचालकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. यानंतर पालिकांनी मुख्य संचालकाविरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adhar Card : फक्त QR कोड स्कॅन करा; सेकंदात खरे अन् बनावट आधार कार्ड ओळखा, कसं? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Pune: ड्युटीवर जातो म्हणत घराबाहेर गेले, फोनही बंद ठेवला अन् सीआरपीएफ जवान प्रशांत कदम यांचा अपघातात मृत्यू

Summer Health Care: कडक उन्हामुळे त्रास होतोय? सतत आजारी पडताय? 'हे' उपाय ठरतील रामबाण इलाज

Oral health problems: सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडतंय? वेळीच व्हा सावध, गंभीर समस्येचं असू शकतं लक्षण

SCROLL FOR NEXT