Thane Water Supply Saam tv
महाराष्ट्र

Thane Water Shortage : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरातील ८ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कुठे? वाचा सविस्तर

Thane Water Cut: बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टिम'मध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे.

विकास काटे, ठाणे

ठाणे : ठाणे महापालिकेस बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुरूस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही कपात झाली आहे. सुमारे ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टिम'मध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. तातडीची तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे ५ डिसेंबरपर्यंत (Water Supply) पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. ही दुरूस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण ३० टक्के पाणी कपातीचा (Thane) ठाणे महापालिकेस सामना करावा लागत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रास दररोज ३० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये. यासाठी विभागवार म्हणजे सकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे; असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवसनिहाय या भागात पाणी पुरवठा बंद 
३ डिसेंबर
- माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली. 

४ डिसेंबर - गांधी नगर, सुभाष नगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोंकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्री नगर १ व २, मैत्री पार्क

५ डिसेंबर - सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकुळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर. 

६ डिसेंबर - दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर. 

७ डिसेंबर - राबोडी १ व २, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर. 
८ डिसेंबर - लोकमान्य पाडा नं. १, २, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, घंटाळी, राम मारूती रोड. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वहिनीला मिळवण्यासाठी सख्ख्या भावाचा काटा; हत्या केल्यानंतरही चेहऱ्यावर हसू,'त्या' क्रूर कृत्याने पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

बीडमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार; दिवसाढवळ्या तरुणाला कारमध्ये बसवून पळवलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Push-Ups Fitness Test: तुमच्या वयानुसार किती पुश-अप्स मारले पाहिजेत? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती, वाचा

SCROLL FOR NEXT