Thane Crime Saam tv
महाराष्ट्र

Thane Crime : भयानक कृत्य! खेळणे देण्याच्या बहाण्याने घरी नेत मुलीवर अत्याचार; आरडाओरड केल्याने सहाव्या मजल्यावरून फेकले

Thane news : राज्यात मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एकट्या मुलीला साधत तिची छेड काढणे किंवा तिच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे

विकास काटे, ठाणे

ठाणे : राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. अशातच एका तरुणाने अल्पवयीन मुलीला खेळणे देण्याच्या बहाण्याने घरी नेट तिच्यावर अत्याचार केला. तो एवढ्यावर थांबला नाही तर अत्याचार केल्यानंतर मुलीला थेट सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या मुंब्रा परिसरात समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

राज्यात मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एकट्या मुलीला साधत तिची छेड काढणे किंवा तिच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. अशीच घटना ठाण्याच्या मुंब्रा परिसरात समोर आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुली किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. 

आरोड्या मारत असल्याने केला गळ्यावर वार 

सदर घटनेत एका वीस वर्षीय तरुणाने खेळणी देण्याचे आमिष दाखवून त्या अल्पवयीन मुलीला घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान सदर मुलगी आरडाओरडा करू लागली. यामुळे घाबरलेल्या तरुणाने मुलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यानंतर तिला थेट सहाव्या मजल्यावरून खाली फेकले; अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात 

ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये अल्पवयीन मुलीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिले. मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लागलीच तपासाला सुरवात करत अत्याचार करणाऱ्या तरुणाला काही तासातच त्याच्या घरातून अटक केली. या प्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर तरुणाने कबुली दिली असल्याची माहिती मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT