Thane, ACB, Bribe Saam Tv
महाराष्ट्र

Thane Zilla Parishad News : ५० हजारांची लाच घेणाऱ्या जल संधारण अधिकाऱ्यास अटक

या घटनेमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली.

विकास काटे

Thane News : कोल्हापूर बंधाऱ्याच्या बांधकामासाठी मंजूर निधीच्या एक टक्का म्हणजे ५० हजारांची लाच स्वीकारणा-या ठाणे जिल्हा परिषदेचे जल संधारण अधिकारी राजेंद्र पाटील (Rajendra Patil) (वय ५७) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधकच्या (Thane ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. एसीबीने शुक्रवारी पाटील यास अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Breaking Marathi News)

तक्रारदाराच्या ग्रामपंचायतीसाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी निधी मंजूर होऊन त्यास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदाराकडे जल संधारण अधिकारी पाटील यांनी या बंधाऱ्याचे बांधकाम सुरु करण्याबाबतची वर्क ऑर्डर (कार्यादेश) देण्यासाठी मंजूर निधीच्या एक टक्के अर्थात पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

२४ मार्च रोजी तक्रारदाराने ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावेळी पाटील यांनी या तक्रारदाराकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीमध्ये उघड झाले. २४ मार्च रोजी दुपारी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातच लावलेल्या सापळयात लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारतांना पाटील यांना रंगेहाथ (Thane ZP official held by Maha ACB for bribery) पकडण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

SCROLL FOR NEXT