Uddhav Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; विधानपरिषदेतील बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार!

Uddhav Thackeray News: ठाकरे गटातील २ बडे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Ruchika Jadhav

Thackeray Group Vs Shinde Group: राज्याचं राजकारण अतिशय गढूळ झालं आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता पुन्हा एकादा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्याता आहे. ठाकरे गटातील २ बडे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये विधानपरिषदेतील एका आमदाराचाही समावेश आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचा मोठा नेता शिवसेना शिंदे गटात जाणार?

यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा आंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यामांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, यामध्ये मला फार काही तथ्य वाटत नाही.

विधानपरिषदेचा तो आमदार नेमका कोण?

ठाकरे गटातील विधानपरिषदेतील एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटात जाणारे आमदार कोण आहेत याचे तर्क लावले जातायत. विधान परिषदेच्या एका आमदारासह दोन मोठे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ यांनी बंड केल्यानंतर भाजप-शिंदे सरकार (BJP - Shinde Government) स्थापन होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र अद्यापही शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची गळती सुरुच आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत ठाकरे गटाचे एकून ४० आमदार फोडले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पून्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आज त्यापेक्षा मोठा धक्का ठाकरेंना बसणार असल्याचं म्हटलं जातय. आज दुपारी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT