Udhav Thackeray  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics News: मालेगावमध्ये जाहीर सभा! दादा भुसेंच्या होम ग्राऊंडवर ठाकरेंची तोफ धडाडणार; राज ठाकरेंचा घेणार समाचार?

Udhav Thackeray News: उद्धव ठाकरे आज मालेगावमध्ये सभा घेत आहेत. उत्तर महाराष्ट्रासाठी ही सभा महत्वाची असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय सोनवणे...

Udhav Thackeray Rally in Malegaon: शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत. ज्यामधील नुकतीच खेडची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आज मालेगावमध्ये सभा घेत आहेत. उत्तर महाराष्ट्रासाठी ही सभा असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या या सभेची ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांची नांदेडमध्ये (Nanded) जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या दोन सभांनी आजचा दिवस गाजणार असल्याचे दिसत आहे.

मालेगावमध्ये आज ठाकरेंची तोफ धडाडणार....

खेडमधील जोरदार सभेनंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये आज जाहीर सभा होत आहे. उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येत असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून नाशिकसह मालेगावचे वातावरण भगवामय झाल्याचे चित्र आहे.

मालेगाव मतदारसंघातून मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे निवडून आले आहेत. सध्या ते नाशिकचे पालकमंत्री असून एका मंत्रीपदाचा कार्यभारही पाहत आहेत. अशातच मालेगावमधून भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत भाजपसह (BJP) शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का दिला. त्यामुळे आजच्या सभेतून अद्वय हिरे जोरदार शक्तिप्रदर्शन करत दादा भूसेंना टक्कर देणार असल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे तेलंगणाचे (Telangana CM) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे यशपाल भिंगे, बहुजन आघाडीचे सुरेश गायकवाड, राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचा भारतीय राष्ट्रीय समितीमध्ये चंद्रशेखर राव यांच्या हस्ते जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

SCROLL FOR NEXT