Sushma andhare news  saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: 'म्हणून इंजिनवाले फडणवीसांच्या मदतीला धावले...' खेडच्या सभेत सुषमा अंधारेंचा मनसेवर हल्लाबोल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खेडमधील आजच्या सभेत भाजप शिवसेनेवर सडकून टीक केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Khed, Ratnagiri: शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्हाचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची आज कोकणात पहिलीच जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीतील खेडमध्ये दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची खेडच्या गोळीबार मैदानावर सभा आहे. या सभेत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Thackeray Group Rally)

काय म्हणाल्या सुषमा अंधारे..

खेडमधील (Khed) सभेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच आपल्या भाषणामध्ये सुषमा अंधारे यांनी "ओरिजनल शिवसेना आमच्याच सोबत आहे, असे म्हणत ती सोबत नसल्यानेच कसब्यामध्ये पराभव स्विकारावा लागला," अशी टीकाही यावेळी केली.

तसेच "निवडणूका लागल्या नाहीत तरी आपल्याला सभा होत आहेत , कारण मराठी माणसाच्या हितासाठी सभा होत आहेत असे म्हणत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांचा महाराष्ट्राशी संवाद तुटत चालला असून दिल्लीश्वराशी संवाद वाढला आहे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

यावेळी सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात अर्थसंकल्पीय अधिवेशनावरुनही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. "अर्थसंकल्प अधिवेशनात यांना बोलायलाच काही नाही, म्हणून हक्कभंग प्रस्ताव आणले जात असल्याचा" आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावरुनही त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

"कसब्यातील निवडणूकीनंतर सर्वत्र रविंद्र धंगेकर यांच्या नावाचीच चर्चा होत असल्याने पराभव झाल्याने देवेंद्र यांच नाव कमी होईल म्हणून इंजिनवाले त्यांच्या मदतीला आले, असे म्हणत मीडिया डायवर्ट करण्यासाठीच संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची बातमी" आल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय काकडे यांची होणारी पत्रकार परिषद रद्द

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! रात्री भात खाण्याऐवजी खा 'हा' 1 पदार्थ; वजन राहील नियंत्रणात

BJP Politics: भाजपला मोठा धक्का! युवा नेता थेट दुसरा पक्ष काढणार; राजकीय वर्तुळात खळबळ

Nandurbar : महाराष्ट्रातील दुर्गम पाड्यावर पहिल्यांदाच चमत्कार घडला! गावकऱ्यांसह लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागले

SCROLL FOR NEXT