Sudhakar Badgujar On Salim Kutta Saam TV
महाराष्ट्र

Sudhakar Badgujar News: 'सलीम कुत्ताशी माझा संबंध नाही', नितेश राणेंच्या आरोपांवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण

Sudhakar Badgujar On Salim Kutta: 'सलीम कुत्ताशी माझा संबंध नाही', असं म्हणता ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

Satish Kengar

Sudhakar Badgujar On Nitesh Rane Allegations:

'सलीम कुत्ताशी माझा संबंध नाही', असं म्हणता ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

नितेश राणे यांनी आरोप केले आहेत की, बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुजर हे पार्टी करत होते. राणे यांनी विधासभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि याचा व्हिडीओही आपल्याकडे असल्याचं ते म्हणाले आहेत. यावरच आता बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुधाकर बडगुजर म्हणाले की, ''पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात जे आरोप केलेत, त्यांनी योग्य माहिती घेतली नाही.'' ते म्हणाले, ''२०१६ मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी सभा झाली होती. त्या सभेविरोधत शिवसैनिकांनी आंदोलन केलं, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. माझ्यावर देखील गुन्हा दाखल होता, मी १५ दिवस तुरुंगात होतो.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, तुरुंगामध्ये बॉम्ब स्फोटातील आरोपी होते. त्यांची आम्हाला कल्पना देखील नव्हती. माझ्यावर ज्या काही केसेस दाखल आहेत, त्या राजकीय आंदोलनातून आहेत. माझं नाव सलीम कुत्ताशी जोडलं गेलं, त्याला ९३ अटक झाली असेल. मला २०१६ मध्ये अटक झाली, त्यावेळी तो कैदी असेल.''

समोर आलेला व्हिडीओ खोटा असून त्यात मोर्फिंग करून त्यांना दाखवण्यात आल्याचं बडगुजर म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, गुन्हेगार बाहेर कसा आला? तो पॅरोलवर बाहेर आल्यानंतर सार्वजनिक जीवनात फिरू शकतो, अशा संदर्भातून भेट झाली असेल, मला माहित नाही. हा व्हिडीओ मॉर्फिंग केलेला आहे, पोलिसांनी चौकशी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

महागाईचा बॉम्ब फुटणार? कोणत्या जीवनावश्यक वस्तू महागणार?

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

भजन करताना चक्कर आली अन्..; थोर समाज प्रबोधनकार रामधन महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन| VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT