प्रदीप पूर्णेकर हत्येच्या दोन दिवस आधी काय घडलं
राम पूर्णेकरांच्या जबाबातून प्रदीप पूर्णेकर प्रकरणात खुलासा
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील राम पूर्णेकरांचा जबाब
ठाण्याच्या मनोरमा नगर परिसरात ठाकरे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकरने शिंदेसेनेच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.
हे दोघे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप राम पूर्णेकर याने केलाय. यानंतर राम पूर्णेकर याने मिनाक्षी शिंदे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान पोलिसांच्या जबाबात राम पूर्णेकर याने नवा खुलासा केलाय. राम पूर्णेकर याने पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबमध्ये मीनाक्षी शिंदे यांच्यासहित राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्यानुसार, प्रदीप पूर्णेकर यांची हत्या होण्यापूर्वी काही दिवसाआधी परिसरातील एक तरुणी दोन मुलांसोबत एका रुममध्ये आढळली होती.
प्रदीप पूर्णेकर यांनी तिकडे जाऊन या मुलीसोबतच्या दोन पुरुषांना मारहाण केली होती. यानंतर प्रदीप पूर्णेकर यांनी संबंधित तरुणीला आणि त्या दोन तरुणांना पकडून कापूरबावडी पोलीस ठाण्यात आणल्याचा उल्लेख पुरवणी आरोपपत्रात आहे. त्यानंतर ही तरुणी पूर्णेकरांच्या हत्येच्या आधी आणि नंतर पूर्णेकरांच्या ऑफिसबाहेर वावरताना दिसून आली, अशी माहिती राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिलीय. त्यामुळे संबंधित तरुणीवर संशय व्यक्त करत तिच्याकडेही तपास करण्याची मागणी जबाबात करण्यात आली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांचं राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदे यांच्याशी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून वैमनस्य निर्माण झालं होतं. सोशल मीडियावरून बदनामी तसेच पूर्णेकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या. राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदे यांनी कट रचून संतोष उर्फ टल्ली कनोजिया, निखिल यादव उर्फ शूटर, नितेश उर्फ भावड्या पवार यांच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचे राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.