Uddhav Thackeray and Raj Thackeray during discussions amid seat-sharing deadlock ahead of Mumbai civic elections. Saam Tv
महाराष्ट्र

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Thackeray Brothers Alliance: ठाकरेबंधूंच्या युतीचं घोडं आता जागावाटपावरून अडलयं.... मराठीबहुल मतदारसंघामध्ये नेमकं कोणाला किती जागा मिळणार? कोणत्या जागांवरून ठाकरेंमध्ये रस्सीखेच आहे?

Suprim Maskar

महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना वेग आला...ठाकरे बंधूंमध्ये युतीचं ठरलं असलं तरी काही जागांवरून मात्र घोडं अडल्याचं दिसतंय. दोन्ही भावांमध्ये अनेक बैठका झाल्या मात्र तरीही काही जागांवरील तिढा सुटायला तयार नाही. मुंबईतल्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघासह मराठीबहुल शिवडी आणि माहिमधल्या जागांवरून पेच निर्माण झालाय.

माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 190,192,194 मध्ये दोन्ही पक्षात रस्सीखेच आहे... तर शिवडी विधानसभेतही वॉर्ड क्रमांक 203, 204, 205 मध्येही ठाकरेसेना आणि मनसेत तिढा आहे...

दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत जागावाटपाचा पेच न सुटल्यानं दोन्ही पक्षांचे प्रमुख स्वतः जागावाटपावरून अंतिम निर्णय घेणार आहेत...यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बैठक घेऊन पुढील रणनिती ठरवतील..

मनसे आणि ठाकरेसेनेच्या युतीची घोषणा झाल्यावर ठाकरेबंधूंकडून मुंबईतच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे आणि राज्यातील इतर भागातही संयुक्त सभांचं आयोजन केलं जाणार आहे.... त्यामुळे जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? मराठी माणसासाठी एकत्र आलेल्या ठाकरेबंधूंना मराठी मताची मोट बांधणं शक्य होणार का? जागावाटपाचं गणित कसं जुळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT