हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं आणि त्यानंतर राजकीय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरु झाली ठाकरे ब्रँडची.. याच ठाकरे ब्रँडची लिटमस टेस्ट म्हणून मनसे आणि ठाकरेसेनेनं बेस्टची निवडणुकही लढवली.. मात्र या निवडणुकीत ठाकरेंच्या युतीचा पराभव झाला.. त्यामुळे ठाकरे ब्रँडवरून टिका करण्याचं आयत कोलित भाजपला मिळालं. भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवल्याची खिल्ली उडवली..तर ठाकरे ब्रँड नसता तर भेटीगाठी घेतल्या नसत्या, असा खोचक टोला मनसे नेते बाळा नांदगावकरांनी लगावला.
गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं होतं..त्यामुळे भाजप विरूद्ध ठाकरेसेना असाच यंदाही सामना रंगण्याची चर्चा सुरू होती. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीही महायुतीचा नारा देत मुंबईवर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा निर्धार केलाय.
ठाकरे बंधूंकडून अद्याप युतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे युतीनंतर ठाकरेसेना आणि मनेसचं जागावाटपाचं समीकरण काय असणार? महायुतीत शिंदेसेनेचा मान भाजप कसा राखणार ? यावर महापालिकेचं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे कुणाचा ब्रँड चमकणार आणि कुणाचा बँड वाजणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.