TET Exam Scam Latur News Saam TV
महाराष्ट्र

TET Exam Scam: टीईटी परिक्षा घोटाळ्यातील १४ शिक्षकांचे वेतन रोखले; शिक्षक वर्तुळात खळबळ

TET Exam Scam Latur News: या घोटाळ्यात ७ हजार ८८० उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचं उघड झालं होतं. म्हणजेच पात्र नसूनही हे उमेदवार शिक्षक बनले होते.

दिपक क्षीरसागर

लातूर: महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टी. ई. टी.) परीक्षा २०१९ मध्ये गैरप्रकार (TET Exam Scam) झाला होता. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या १४ सहशिक्षकाचे वेतन रोखण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाच्या (मा.) अधिक्षकांनी ऑगस्ट २०२२ पासूनचे वेतन पुढील आदेशापर्यंत बंद करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. यामुळे शिक्षक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (TET Exam Scam Latur News)

हे देखील पाहा -

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता (टी. ई. टी.) परीक्षेत २०१९ मध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील ११ शाळांतील १४ कर्मचारी शिक्षण सेवक, सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आणि शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत आहेत, असे स्पष्ट झाल्याने या यादीतील एकूण १४ उमेदवारांचे शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात आले आहेत. गोठविण्यात आलेल्या शालार्थ आयडी उमेदवारांची नावे ऑगस्ट २०२२ च्या वेतन देयकात समाविष्ट असण्याची शक्यता असल्याने सदरचे वेतन देयक रद्द करुन संबंधिताचे नाव देयकातून वगळण्याचे अथवा वेतन देयक, फरक देयक ऑनलाईन किंवा ऑफलाईन वेतन अनुदान (Salary) अदा न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लातूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या यादीत लातूर जिल्ह्यातील ११ शाळांतील १४ शिक्षकांचे ऑगस्ट २०२२ पासूनचे वेतन पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यादीतील १४ शिक्षकांचे वेतन ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अदा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोण्या शिक्षकाचे वेतन दिल्यास नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या (मा.) अधिक्षक मुख्यशिक्षकांनी मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

काय आहे टीईटी घोटळा?

२०१९-२०२० या काळात टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. पुणे सायबर पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्यात ७ हजार ८८० उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचं उघड झालं होतं. म्हणजेच पात्र नसूनही हे उमेदवार शिक्षक बनले. आता या सर्व शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना नोकरीवरुन हटवण्यात येणार आहे. अशा बोगस शिक्षकांची यादीही परीक्षा परीषदेने नुकतीच जाहीर केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT